श्रीब्रह्मानंद (मूळ नाव: अनंत बाळंभट्ट गाडगुळी) ( २७ फेब्रुवारी १८५९ - निर्वाण: सन १९१८)

श्रीब्रह्मानंद
मूळ नाव अनंत बाळंभट्ट गाडगुळी
जन्म २७ फेब्रुवारी १८५९
जालिहाल (कर्नाटक)
निर्वाण सन १९१८
कागवाड (कर्नाटक)
संप्रदाय समर्थ संप्रदाय
गुरू श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज
भाषा कन्नड
कार्य श्रीब्रह्मचैतन्य महाराजांच्या आज्ञेने कर्नाटकात रामनामाचा प्रसार, राममंदिरांची स्थापना
संबंधित तीर्थक्षेत्रे गोंदवले (महाराष्ट्र), बेलधडी, वेंकटापूर, गदग, जालिहाल, कागवाड (कर्नाटक)
वडील बाळंभट्ट

हे श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे शिष्य होते. त्यांच्या गुरूनिष्ठेमुळे ते श्रीब्रह्मचैतन्य महाराजांचे 'कल्याणस्वामी' म्हणून ओळखले जात. कर्नाटकात रामनामाचा प्रसार करण्याचे महत्कार्य त्यांनी केले.


पूर्ववयात त्यांनी तर्क, साहित्य, व्याकरण व वेदांत यांचा सखोल अभ्यास केला. परंतु अभ्यास संपत आला असताना त्यांच्या हाताच्या बोटांवर कोडाचे डाग दिसू लागले व निव्वळ पुस्तकी शास्त्राध्ययनाचे वैयर्थ्य त्यांना पटले. त्यांना सद्गुरूभेटीचा ध्यास लागला. ईश्वरी संकेताने त्यांची इंदूर येथे श्रीसद्गुरूंशी भेट झाली. परंतु प्रथम भेटीत त्यांना सद्गुरूंचे श्रेष्ठत्व आकलन झाले नाही. दुसऱ्या भेटीत ते त्यांना शरण गेले. श्रीसद्गुरूंनी त्यांना अनुग्रह देऊन त्यांचे नाव 'ब्रह्मानंद' असे ठेवले. सद्गुरूंच्या आज्ञेने त्यांनी नर्मदातटाकी राममंत्राचे पुरश्चरण केले.

श्रीसद्गुरूंनी त्यांना कर्नाटकात श्रीरामनामाचा प्रसार करण्याची आज्ञा दिली. त्यानुसार त्यांनी बेलधडीला श्रीराममंदिराची स्थापना करून आपल्या कार्याला सुरुवात केली. व्यंकटापूर येथील व्यंकोबाच्या (व्यंकटेश) मंदिराचा त्यांनी जीर्णोद्धार केला. कर्नाटकात श्रीब्रह्मानंदांचे अनेक शिष्य झाले.

श्रीब्रह्मचैतन्य महाराजांनी सन १९१३ मध्ये देह ठेवल्यानंतर त्यांना जिणे व्यर्थ वाटू लागले. त्यांनी कागवाड (कर्नाटक) येथे सन १९१८ मध्ये देह ठेवला. तेथे त्यांचे समाधिमंदिर आहे.