श्रीनिवास दादासाहेब पाटील

भारतीय राजकारणी

श्रीनिवास दादासाहेब पाटील (जन्म: ११ एप्रिल १९४१) हे भारत देशाच्या महाराष्ट्रामधील एक राजकारणी आहेत. ते सातारा लोकसभा मतदारसंघातील विद्यमान संसद सदस्य आहेत. ते सिक्किम राज्याचे माजी राज्यपाल आहेत. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून तेराव्या आणि चौदाव्या लोकसभेमध्ये कराड मतदारसंघातातून खासदार राहिलेले आहेत. ते भारतीय प्रशासनिक सेवेचे अधिकारी सुद्धा होते. ऑक्टोबर २०१९च्या लोकसभा पोटनिवडणुकीत त्यांनी सातारा जिल्ह्यातील उदयनराजे भोसले यांचा पराभव केला.

श्रीनिवास दादासाहेब पाटील

सिक्किमचे राज्यपाल
कार्यकाळ
जुलै २०१३ – ऑगस्ट २०१८
मागील बालमीकी प्रसाद सिंह

कार्यकाळ
इ.स. १९९९ – इ.स. २००९
मतदारसंघ कराड

जन्म ११ एप्रिल, १९४१ (1941-04-11) (वय: ७९)
मारूल-हवेली, सातारा जिल्हा, महाराष्ट्र
राजकीय पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
पत्नी रजनीदेवी पाटील
अपत्ये २ मुलगे.
निवास कराड, महाराष्ट्र

संदर्भसंपादन करा