श्रीकृष्ण शिक्षण संस्था गुंजोटी


श्रीकृष्ण शिक्षण संस्था, गुंजोटी

संपादन

स्वंतंत्र्यापूर्वी स्थापना :   इ. स. १९२७

संपादन
  • स्थापनेचा उद्देश:निजाम सरकारच्या काळातही राष्ट्रीय शिक्षणाचा प्रसार
  • गुंजोटी गावाची पार्श्वभूमी :निजामकाळात ‘पायगा’ (जिल्ह्याचे ठिकाण) हा दर्जा. गुंजोटी (ता. उमरगा) व परिसरावर आर्यसमाजाच्या विचारधारेचा प्रभाव.  मराठवाडा मुक्ति संग्रामकाळात गुंजोटी येथील हुतात्मा वेदप्रकाश यांचे बलिदान
  • संस्थेचा पूर्व इतिहास:कै. श्रीनिवासजी शाईवाले व कै. हरिपंत राखेलकर गुरुजी यांनी १९२७ मध्ये केवळ ७ विद्यार्थी घेऊन ‘श्रीकृष्ण पाठशाळा’ या राष्ट्रीय शाळेची स्थापना केली. गुंजोटी हे परिसरातील महत्त्वाचे शैक्षणिक केंद्र बनले.
  • श्रीकृष्ण विद्यालय : स्वातंत्र्य प्राप्तीपर्यंत १ ली ते ७ वीचे वर्ग,१९५१-५२ मॅट्रिक. १९६० साली विद्यार्थी संख्या ३००,१९६२ मध्ये विद्यालयाचे नवीन इमारतीत स्थलांतर, १९६५ मध्ये विद्यार्थी संख्या ५००,आजची विद्यार्थी संख्या २५००हून अधिक
  • संस्थेची उत्कर्षाची मुहूर्तमढ: माजी खासदार कै. तुलशीरामजी पाटील व डॉ. दामोदर पतंगे यांचा १९८५ साली अध्यक्ष व सचिव या नात्याने पदभाराचा स्वीकार, कुठल्याही राजाश्रया शिवाय संस्थेचा विकास व विस्तार
  • कनिष्ठ महाविद्यालयाची स्थापना: १९८६ साली कला, वाणिज्य , विज्ञान या शाखासह सुरुवात, कनिष्ठ महाविद्यालयाची स्वतंत्र,सुसज्य इमारत
  • श्रीकृष्ण महाविद्यालयाची स्थापना: उमरग्याचे तत्कालीन आमदार ना. पै. खालिकमीयां काझी, पालकमंत्री डॉ. पद्मसिंहपाटील व मुख्यमंत्री शरद पवार यांच्या सहकार्याने आणि संस्थाचालकांच्या अथक प्रत्यनांनी कला व विज्ञान या शाखांसह श्रीकृष्ण महाविद्यालयाची १९९१ साली स्थापना. जून २००७ पासून कौशल्यावर आधारित तर एम.एस्सी. संगणकशास्त्र व गणित या पदव्युत्तर अभ्यासक्रमाचा शुभारंभ २०१५ साली युजीसी नॅक कडून ‘ब’ मानांकन प्राप्त. युजीसी कडून कारकीर्द ओरियंटेड अभ्यासक्रमास मान्यता.‘सावित्रीबाई फुले ग्रामीण मुलींचे वसतिगृह’ मुलीकरिता अद्यावत सुविधासह उपलब्ध.