श्रीकांत हा २०२४ मधील हिंदी भाषेतील चरित्रात्मक चित्रपट आहे. हा चित्रपट बोलंट इंडस्ट्रीजचे संस्थापक श्रीकांत बोला यांच्या आयुष्यावर आधारित आहे. मुख्य भूमिकेत राजकुमार राव अभिनीत, तुषार हिरानंदानी यांनी दिग्दर्शित केला असून, सहकलाकार ज्योतिका, अलाया एफ आणि शरद केळकर आहेत.[]

नोव्हेंबर २०२२ ते जानेवारी २०२३ या दोन महिन्यांत भारत आणि यूएसएच्या विविध ठिकाणी या चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आले.[] हा चित्रपट १० मे २०२४ रोजी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर थिएटरमध्ये प्रदर्शित झाला.[][][]

कथानक

संपादन

श्रीकांत बोल्ला यांनी २०१२ मध्ये अकुशल आणि दिव्यांग व्यक्तींना पर्यावरणपूरक उत्पादने तयार करण्यासाठी कामावर ठेवण्यासाठी तयार केलेल्या बोलंट इंडस्ट्रीजचे संस्थापक म्हणून नावलौकिक मिळवला. या चित्रपटात श्रीकांतच्या संघर्षाची कथा दर्शविली आहे, जो तत्कालीन अविभाजित आंध्र प्रदेश मधील मछलीपट्टणम मधील सीतारामपुरम गावात दृष्टिहीन म्हणून जन्माला आला होता.[] प्रतिकूल परिस्थितीतही श्रीकांतने मिळवलेले यश हा चित्रपट दाखवतो. बोलाच्या वडिलांनी आपल्या मुलाचे नाव क्रिकेट खेळाडू कृष्णम्माचारी श्रीकांत यांच्या नावावर ठेवले. परंतु दृष्टीहीन नवजात बालकाला पाहून त्याचे वडील निराश होतात आणि त्याला पुरण्यासाठी खड्डा खणतात पण त्याची आई त्याला वाचवते. हुशार असूनही त्याला स्थानिक शाळेत गुंडगिरी सहन करावी लागते.

नंतर श्रीकांत हैदराबादला स्थलांतरित होतो, जिथे तो एका शाळेत जातो आणि चमकतो, परंतु त्याच्या अहंकारामुळे त्याला काढून टाकले जाते. नंतर त्याची शिक्षिका देविका त्याला मार्गदर्शन करते. ही शिक्षिका त्याला हाताशी धरून विज्ञान विषयाचा अभ्यास करण्यासाठी न्यायालयात खटला दाखल करण्यास मदत करते (९८% गुण मिळवूनही). इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये प्रवेश नाकारल्यानंतर तिने त्याला परदेशात अर्ज करण्यास प्रवृत्त केले. शेवटी त्याला मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये प्रवेश मिळतो, जिथे त्याला पहिला आंतरराष्ट्रीय दृष्टिहीन विद्यार्थी म्हणून मान मिळाला.[] त्याच्या कॉलेजच्या दिवसांत, सोशल मीडियाच्या माध्यमातून तो स्वातीला भेटतो जी त्याच्यावर मोहित झाली होती. ग्रॅज्युएशननंतर, स्वाती त्याला भारतात परत येऊन त्याची स्वप्ने साकार करण्यास प्रवृत्त करते. त्याचे गुरू त्याला संगणक संस्था सुरू करण्यास मदत करतात, जी फ्लॉप होते. नंतर त्याने आपला व्यवसाय भागीदार रवी मंथा सोबत एक संस्था, बोलंट इंडस्ट्रीज सुरू करण्याचा निर्णय घेतला, जिथे तो बहुतांश अपंगांना नोकऱ्या देतो. त्याच्या भागिदारासोबत सोबत त्याचे काही गैरसमज होतात, परंतु गुरूकडून सतत मार्गदर्शन मिळाल्याने त्याला अपेक्षित यश प्राप्त होते.[][]

पात्र

संपादन

 

साउंडट्रॅक

संपादन
श्रीकांत
साउंडट्रॅक द्वारे
तनिष्क बागची, सचेत परंपरा, आदित्य देव आणि वेद शर्मा
प्रदर्शित १३ मे २०२४[]
ध्वनीबध्द 2023
शैली चित्रपट गीते
लांबी 20:22
भाषा हिंदी
फीत T-Series

या चित्रपटाचे स्ट्रीमिंग माध्यम अधिकार नेटफ्लिक्सने ₹२० कोटींना विकत घेतले होते. चित्रपटाचे सॅटेलाइट हक्क सोनी नेटवर्कला ₹७ कोटींना विकले गेले.[१०] ५ जुलै २०२४ पासून हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला [११] या चित्रपटाने पहिल्या वीकेंडला भारतात ₹११.९५ निव्वळ कोटींची कमाई केली. १७ जून २०२४ पर्यंत, चित्रपटाने भारतात ₹५९.५८ कोटी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ₹३.३४ कोटी, एकूण जगभरात ₹६२.९२ कोटी कमाई केली.[१२]

संदर्भ

संपादन
  1. ^ "'Srikanth' trailer: Rajkummar Rao promises a hard-hitting performance in the biopic drama". The Hindu. 10 April 2024. 14 April 2024 रोजी पाहिले.
  2. ^ a b "Srikanth trailer: Rajkummar Rao plays visually challenged industrialist Srikanth Bolla in inspirational biopic. Watch".
  3. ^ "'Srikanth': Rajkummar Rao shares 1st look from biopic, to release on May 10". India Today. 5 April 2024. 14 April 2024 रोजी पाहिले.
  4. ^ "Rajkummar Rao's film on Srikanth Bolla gets new title, new release date Deets inside".
  5. ^ "Srikanth Trailer: Rajkummar Rao As Srikanth Bolla Aims To Become India's First Blind President, Jyotika & Alaya F Shine". MSN. 10 April 2024. 14 April 2024 रोजी पाहिले.
  6. ^ "Srikanth Bolla: First overseas blind student at MIT, entrepreneur who employs the disabled, and subject of a new bollywood film".
  7. ^ "Srikanth movie review: Rajkummar Rao brings skill and sincerity to this inspiring biopic".
  8. ^ "Srikanth review: Rajkummar Rao bowls you over with his resilience and wit in this inspiring biopic".
  9. ^ "श्रीकांत". जिओ सावन. 13 May 2024. 20 May 2024 रोजी पाहिले.
  10. ^ "Decoding the economics of Srikanth: Rajkummar Rao starrer budget, box office, and verdict". Pinkvilla (इंग्रजी भाषेत). 2024-06-11. 2024-06-13 रोजी पाहिले.
  11. ^ "Srikanth OTT release: Rajkummar Rao, Alaya F starrer to hit Netflix on THIS day". India TV News. 4 July 2024 रोजी पाहिले.
  12. ^ "Srikanth Box Office". Bollywood Hungama.