श्रीकांत बोजेवार हे एक मराठी लेखक आहेत, आणि सध्या (२०१५ साली) दैनिक लोकसत्ताचे मुंबईतील निवासी संपादक आहेत. तंबी दुराई या टोपणनावाने ते रविवारच्या लोकसत्तेत ’दोन फुल एक हाफ’ हे सदर सतत १२हून अधिक वर्षे लिहीत आले आहेत.

श्रीकांत बोजेवार यांची पुस्तके

संपादन
  • अशी ही तहान (पटकथा)
  • एक हजाराची नोट (पटकथा)
  • गोंडस पोगुंडाच्या गोष्टी (बालसाहित्य)
  • दोन फुल एक हाफ (ललितेतर लेखसंग्रह)
  • पावणेदोन पायांचा माणूस (कादंबरी)
  • शुक्रवार उजाडण्यापूर्वी


श्रीकांत बोजेवार यांना मिळालेले पुरस्कार

संपादन
  • ’दोन फुल एक हाफ’ या पुस्तकाला ठाण्याच्या मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या वतीने देण्यात येणारा ललितेतर विभागासाठीचा वा. अ. रेगे वाङ्मयीन पुरस्कार (मे-जून २०१४)
  • ‘निनाद’ संस्थेच्या वतीने देण्यात येणारा ‘स्वातंत्र्यवीर सावरकर अक्षरशब्द’ पुरस्कार (३१ मे २००९)
  • ’एक हजाराची नोट’ (प्रथम प्रदर्शन- १८ मार्च २०१४) हा चित्रपट (दिग्दर्शक - श्रीहरी साठे) अनेक चित्रपट महोत्सवात गाजतो आहे आणि पुरस्कार मिळवत आहे. (२०१५ सालच्या पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल (PIFF) मध्ये श्रीकांत बोजेवार यांना ’एक हजाराची नोट’च्या पटकथेबद्दल उत्कृष्ट पटकथेचा पुरस्कार मिळाला आहे.)

(अपूर्ण)


पहा : टोपणनावानुसार मराठी लेखक