प्रा. डॉ. श्रीकांत कार्लेकर हे मराठी लेखक आहेत. ते विज्ञान, भूगोल, पर्यावरण आदी विषयांसह ललित लेखनही करतात. विविध नियतकालिकांमध्ये कार्लेकरांचे भौगोलिक विषयांवरचे लेख प्रकाशित झाले आहेत. भारतीय मान्सूनची ओळख करून देणारा ‘अचंबित करणारी सूत्रबद्ध यंत्रणा’ हा लेख, तसेच ११ डिसेंबर या आंतरराष्ट्रीय पर्वतदिनानिमित्त दैनिक सकाळमध्ये आलेला त्यांचा ‘साद देती पर्वतशिखरे’ हे लेख वाचकांना आवडले.

वाळूच्या टेकडीचे “केळशी” गाव कोकणात भारजा नदीच्या दक्षिणेला वसले आहे. नदीच्या मुखाजवळील प्रदेशात आणि किनाऱ्यालगत जुन्या वस्तीचे अवशेष सापडतात. हे अवशेष सुमारे १८ मीटर वाळूच्या थराखाली आढळले आहेत. प्रा. डॉ. श्रीकांत कार्लेकर यांनी इ.स. १९९०मध्ये या टेकडीचा शोध लावला. त्यानंतर डॉ. अशोक मराठे यांनी याबाबतचे सर्व समावेशक संशोधन पुढे आणले.

डॉ. श्रीकांत कार्लेकर यांची पुस्तके संपादन

  • कातरवेळ (कथासंग्रह)
  • Coastal Process And Landforms (भूगोलशास्त्रावरील क्रमिक पुस्तक)
  • चक्रव्यूह (कादंबरी)
  • Terms And Concepts In Geomorphology, Oceanography and Climatology
  • दूरसंवेदन : Remote Sensing (भूगोलशास्त्रावरील क्रमिक पुस्तक)
  • दूरसंवेदन आणि भौगोलिक माहिती प्रणाली (माहितीपर)
  • पर्यावरण समस्या निराकरण व क्षेत्र अभ्यास
  • पात्रता व स्पर्धा परीक्षांसाठी वैज्ञानिक लेख
  • पृथ्वीजिज्ञासा
  • प्राकृतिक भूगोल आणि भूरूपशास्त्र
  • प्राकृतिक भूगोलाची मूलतत्त्वे (सहलेखक प्रा. अ.वि. भागवत)
  • प्रात्यक्षिक भूगोल : Practical Geography (सहलेखिका प्रा. सौ. कांचन शेंडे)
  • भूगोल (स्पर्धा परीक्षेसाठी क्रमिक पुस्तक). सहलेखक प्रा. अ.वि. भागवत आणि प्रा संजय नलावडे
  • भूगोल-पर्यावरणशास्त्रकोश : Encyclopaedia of Geography-Environmental Science (सहलेखक जॉन्सन बोर्जेस)
  • भूगोलशास्त्रातील संख्याशास्त्रीय पद्धती : Statistical Methods in Geography (भूगोलशास्त्रावरील क्रमिक पुस्तक)
  • भूगोलातील प्रात्यक्षिके (सहलेखिका प्रा. कांचन शेंडे)
  • भूगोलशास्त्रातील संशोधन पद्धती (सहलेखक डॉ. मोहन काळे)
  • भौगोलिक माहिती प्रणाली : Geographical Information Systems - GIS
  • महाराष्ट्राचा भूगोल (सहलेखिका प्रा. शैलजा सांगळे)
  • माझा समुद्र शोध (पर्यटन आणि सागरविज्ञान)
  • Statistical Analysis Of Geographical Data (भूगोलशास्त्रावरील क्रमिक पुस्तक)
  • हवामानशास्त्र आणि सागरशास्त्र.

डॉ. श्रीकांत कार्लेकर यांना मिळालेले पुरस्कार संपादन

  • ‘पृथ्वीजिज्ञासा’ या पुस्तकासाठी पुणे मराठी ग्रंथालयाचा स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार (मे २०१७)

बाह्य दुवे संपादन

  • [१] श्रीकांत कार्लेकर यांची पुस्तके