श्रीअरविंद अथवा चैतन्याचे अपूर्व साहस (पुस्तक)

श्रीअरविंद अथवा चैतन्याचे अपूर्व साहस हे पुस्तक 'श्रीऑरोबिंदो ऑर द ॲडव्हेंचर ऑफ कॉन्शियसनेस' या पुस्तकाचा अनुवाद आहे. हा अनुवाद श्री.भा.वि.कुलकर्णी यांनी केला आहे. मूळ इंग्रजी पुस्तक सत्प्रेम यांनी लिहिलेले आहे.

श्रीअरविंद अथवा चैतन्याचे अपूर्व साहस
लेखक सत्प्रेम
मूळ शीर्षक (अन्य भाषेतील असल्यास) श्रीऑरोबिंदो ऑर द ॲडव्हेंचर ऑफ कॉन्शसनेस
अनुवादक श्री.भा.वि.कुलकर्णी
भाषा इंग्रजी - मराठी
देश फ्रान्स व भारत
साहित्य प्रकार जीवनचरित्र
प्रकाशन संस्था द मदर्स इन्स्टिट्यूट ओ रिसर्च, दिल्ली आणि मीरा अदिती, म्हैसूर
प्रथमावृत्ती २००१
विषय श्रीअरविंद यांचे आंतरिक चरित्र
पृष्ठसंख्या ३९०
आय.एस.बी.एन. 81-85137-67-6

पुस्तकाची मांडणी

संपादन

प्रास्ताविक आणि प्रस्तावना यांखेरीज या पुस्तकामध्ये एकंदर १७ प्रकरणे आहेत. शेवटी निष्कर्ष, कालानुक्रम आणि संदर्भ अशी परिशिष्टवजा मांडणी केली आहे.

पुस्तकाचे वैशिष्ट्य

संपादन

हे केवळ चरित्र नाही तर यामध्ये श्रीअरविंद यांच्या पूर्णयोगाचा त्यातील चेतनेच्या स्तरांचा विचार करण्यात आलेला आहे. चेतनेच्या उत्क्रांतीचा सिद्धांत आणि श्रीअरविंद यांचे चरित्र यांची गुंफण यामध्ये करण्यात आलेली आहे. []

संदर्भ

संपादन
  1. ^ श्रीअरविंद अथवा चैतन्याचे अपूर्व साहस, सत्प्रेम, मलपृष्ठ