श्रामणेर

(श्रामणेरी या पानावरून पुनर्निर्देशित)

श्रामणेर अथवा श्रामणेरी म्हणजे असा तरुण मुलगा अथवा मुलगी ज्यांनी मुंडन करून अंगावर काशाय वस्त्र धारण करून त्रिशरणासह पब्बज्जा - दसशील भिक्खुकडून ग्रहण करून नुकताच संघात प्रवेश केलेला आहे. अर्थात जीवनभर दहा शीलांचे पालन करण्याचे व्रत घेतले आहे व ते भिक्खु जीवनाशी पूर्वपरिचित नसतात.[]

थायलंड मधील श्रामणेर
कोरियन बौद्ध धर्म परंपरागत श्रामणेर
थायलंड मधील बाल श्रामणेर
बान फा चुक थायलंड प्रांतातील बौद्ध श्रामणेर

वयाच्या ७व्या वर्षापासून श्रामणेर दीक्षा दिला जातो. हे श्रामणेर २० वर्षे वयाने पूर्ण झाले की उपसंपदा दीक्षा संस्कार करतात व त्यानंतरच त्यांना भिक्खू म्हणले जाते. २० वर्षापेक्षा कमी वयाच्या श्रामणेराची उपसंपदा केली जात नाही अथवा होत नाही.[]

श्रामणेरालाही भन्ते म्हणतात, परंतु भदंत किंवा भिक्खू म्हणत नाहित. श्रामणेरास भिक्खू यंघाद्वारे उपसंपदा दिल्यानंतरच त्यांना भिक्खू म्हणतात. श्रामणेरीला दसशील माता किंवा माताजी म्हणतात. त्यांना भन्ते, भिक्खूणी, किंवा भदंत म्हणत नाहित.

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ डॉ. आंबेडकरी प्रणाली आणि आपण, लेखक - हि.गो./भाऊ लेखंडे, पारिजात पिरकाशन, पृष्ठ क्र. १९४
  2. ^ बुद्ध धम्म परिचय विद्यार्थ्यांकरिता पृ. ४३/३९