षोरणूर
केरळमधील शहर, भारत
(शोरणूर या पानावरून पुनर्निर्देशित)
षोरणूर (मल्याळम: ഷൊര്ണൂര്) हे भारत देशाच्या केरळ राज्यामधील पलक्कड जिल्ह्यातील एक लहान शहर आहे. शोरणूर हे शहर केरळच्या राजधानी तिरुवनंतपुरमच्या ३१० किमी उत्तरेस तर पलक्कडच्या ५० किमी पश्चिमेस भारतपुळा नदीच्या उत्तर किनाऱ्यावर वसले असून २०११ साली येथील लोकसंख्या सुमारे ४३ हजार होती.
षोरणूर ഷൊര്ണൂര് |
|
भारतामधील शहर | |
रेल्वे स्थानक |
|
देश | भारत |
राज्य | केरळ |
जिल्हा | पालक्काड जिल्हा |
समुद्रसपाटीपासुन उंची | १५७ फूट (४८ मी) |
लोकसंख्या (२०११) | |
- शहर | ४३,५३३[१] |
प्रमाणवेळ | भारतीय प्रमाणवेळ |
शोरणूर येथे केरळ कलामंडलम ही भारतामधील नामांकित शास्त्रीय नृत्याची शिक्षणसंस्था आहे. शोरणूर हे भारतीय रेल्वेचे केरळमधील सर्वात वर्दळीचे जंक्शन असून येथून कोळिकोड, तृशुर, पालक्काड व निलांबूरकडे मार्ग जातात. कोकण रेल्वेमार्गे केरळ व तमिळनाडूकडे तसेच कोइंबतूरमार्गे केरळकडे जाणाऱ्या सर्व गाड्या शोरणूरमार्गे धावतात. तिरुवनंतपुरम राजधानी एक्सप्रेस, केरळ एक्सप्रेस इत्यादी येथून जाणाऱ्या काही उल्लेखनीय रेल्वेगाड्या आहेत.
संदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ "Shoranur Population Census 2011". 17 Nov 2015 रोजी पाहिले.
बाह्य दुवे
संपादन- शोरणूर महापालिका Archived 2016-01-24 at the Wayback Machine.