शेल्बोर्न हॉटेल हे आयर्लंडच्या डब्लिन या शहरातील पंचतारांकित होटेल आहे. सेंट स्टीवन ग्रीन भागात असलेल्या या होटेलमध्ये २६५ खोल्या असून ते सध्या मॅरियट इंटरनॅशनलच्या मालकीचे आहे.

इतिहास

संपादन

टिप्पेरारीच्या मार्टिन बर्कने डब्लिन मधील युरोप युरोपातील सर्वात मोठ्या उद्यानाच्या कोपऱ्यावर असलेले सेंट स्टीवन ग्रीनच्या शेजारी असलेली तीन टाऊन हाऊस ताब्यात घेऊन मार्च १८२४ मध्ये शेल्बोर्न हॉटेलची स्थापना केली. बर्कने या हॉटेलला विल्यम पेटी, शेल्बोर्नचा दुसरा अर्ल याचे नाव दिले.[]

जॉन मॅककर्डी यांनी या हॉटेलची रचना केली. पॅरिस येथील एम.एम. बरबेझेट यांनी या हॉटेलचे प्रांगणात दोन नुबियन राण्या आणि त्यांच्या गुलाम मुलींचे पुतळे उभारले. १९०० च्या दशकात एडोल्फ हिटलरचा सावत्र भाऊ ॲलोईस हिटलर या होटेलात काम करीत.

१९१६चा ईस्टर उठाव १९१६ च्या ईस्टर उठावादरम्यान येथे ४० ब्रिटिश सैनिक व अधिकारी ठाण मांडून होते. त्यांचे लक्ष्य मायकेल मॅलिनची आयरिश सिटिझन आर्मी आणि इतर स्वयंसेवी सैनिकांचा सामना करणे होते..[]

१९९२२मध्ये आयरिश सरकारने या हॉटेलच्या ११२ क्रमांकाच्या खोलीत आयर्लंडच्या घटनेचा मसुदा तयार केला. ती खोली आता घटना खोली म्हणून ओळखली जाते.[]

सुविधा

संपादन

येथील खोल्यांची जुनियर सुट्स, डीलक्स रूम, हेरिटेज पार्कव्हयू रूम, हेरिटेज क्लब जुनियर सूट, क्वीनरूम, हेरिटेज प्रीमियम गेस्ट रूम, अशी विभागणी आहे. या हॉटेलच्या सगळ्या खोल्या वातानुकूलित आहेत. तेथे रेफ्रीजिरेटर, दूरचित्रवाणी संच, आरामदायक बेड, इजिप्ती अंथरुणे, आंतरजाल सुविधा, हेयर ड्रायर, स्पा, मशाज, मनोरंजन सुविधा, पाळणा घर, भेट वस्तु दुकान, दैनिके, इ. सुविधा आहेत.

येथे दोन उपाहार गृहे असून शिवाय २४ तास खोलीत खानपान मिळण्याची सेवा आहे तसेच दोन बार आहेत.

संदर्भ

संपादन
  1. ^ "हाउ द शेल्बोर्ण हॉटेल फेकड् वॉज रिस्टोर्ड" (इंग्लिश भाषेत). २५-०४-२०१६ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  2. ^ "शेल्बोर्न हॉटेल इतिहास" (इंग्लिश भाषेत). २५-०४-२०१६ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  3. ^ "फ जी इनसाईडर ब्रिफ्स द टॉप बँकर्स ॲट प्रायवेट डिनर : कॉक्स मार्क्स द कार्ड ऑफ कॉरपोरेट इलाइट ऑन क्रायसेस" (इंग्लिश भाषेत). २५-०४-२०१६ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)