शेरॉन मिल्स ड्रेपर (जन्म: २१ ऑगस्ट १९४८) [] [] या अमेरिकन बालसाहित्य लेखक, व्यावसायिक शिक्षक आणि 1997 या वर्षाच्या मानांकितराष्ट्रीय शिक्षक आहेत.आफ्रिकन-अमेरिकन लहान आणि किशोरवयीन मुलांच्या अनुभवांवर आधारित पुस्तकांसाठी त्या पाच वेळा कोरेटा स्कॉट किंग अवॉर्डच्या विजेत्या ठरल्या आहेत. ती हेझलवुड आणि जेरिको ही पुस्तक मालिका,, कॉपर सन , डबल डच, आउट ऑफ माय माइंड आणि रोमिएट आणि ज्युलिओ या पुस्तकांसाठी त्या प्रसिद्ध आहेत.

शेरॉन ड्रेपर
जन्म २१ ऑगस्ट १९४८

वैयक्तिक जीवन

संपादन

ड्रेपरचा जन्म क्लीव्हलँड, ओहायो येथे झाला. व्हिक्टर डी. मिल्स आणि कॅथरीन गॅचेट मिल्स हे त्यांचे आई-वडील आहेत. त्यांना दोन लहान भावंडे आहेत. [] लहानपणी त्या पियानो वाजवत असत आणि त्यांना वाचनाची आवड होती. [] अकरा वर्षाच्या होईपर्यंत स्थानिक लायब्ररीतील जवळजवळ सर्व लहान मुलांची पुस्तके त्यांनी वाचून काढली. त्यामुळे प्रौढांची पुस्तके घेऊन जाण्यसाठी त्यांना विशेष लायब्ररी कार्ड देण्यात आले होते. []

[./Https://en.wikipedia.org/wiki/Pepperdine_University पेपरडाइन युनिव्हर्सिटीमधून] त्यांनी बॅचलर डिग्री घेतली आणि 1974 मध्ये त्यांनी [./Https://en.wikipedia.org/wiki/Miami_University_of_Ohio ओहायोच्या मियामी युनिव्हर्सिटीमधून] इंग्लिशमध्ये मास्टर्स ऑफ आर्ट्स पदवी मिळविली. [] पदवी शिक्षणानंतर त्या सिनसिनाटी पब्लिक स्कूल्समध्ये त्या शिकवत होत्या.[] या काळात त्यांनी लिहिलेल्या "ड्रेपर पेपर" या आव्हानात्मक शोधनिबंधामुळे त्या स्थानिक पातळीवर प्रसिद्ध झाल्या. [] []

त्या विवाहित असून त्यांना चार मुले आहेत. शिक्षिका म्हणून काम करत असताना नववीतील एका विद्यार्थ्याने "काहीतरी लिहा" असे आव्हान त्यांना दिले आणि त्यांची स्वतःची लेखन कारकीर्द 1990 मध्ये सुरू झाली. [] [] [] इबोनी मासिकामार्फत घेण्यात आलेल्या लेखन स्पर्धेसाठी "एक लहान टॉर्च" नावाची लघुकथा त्यांनी लिहिली. जिंकल्यावर ड्रेपरला पुरस्कार स्वरूप पाच हजार डॉलर्स देण्यात आले आणि तिची कथा प्रकाशित झाली. त्यासाठी रुट्सचे लेखक अॅलेक्स हेली यांनी त्यांचे अभिनंदन केले. आपण लेखक होऊ शकतो याची जाणीव करून देण्याचे श्रेय ती या पत्राला देते. [] लेखनासाठी अधिक वेळ देण्यासाठी 2000 साली त्यांनी अध्यापनातून निवृत्ती स्वीकारली. [] [] ड्रेपर त्यांच्या पतीसोबत सिनसिनाटीमध्ये राहतात. [१०]

पुरस्कार आणि सन्मान

संपादन

वैयक्तिक पुरस्कार

संपादन

शेरॉन ड्रॅपरला लेखक पुरस्कार विभागातील पाच कोरेटा स्कॉट किंग बुक अवॉर्ड्स मिळाले आहेत : 1998 फोर्ज्ड बाय फायर, 2007 कॉपर सन; लेखक सन्मान: 2004 द बॅटल ऑफ जेरिको, 2008 नोव्हेंबर ब्लूज ; जॉन स्टेप्टो अवॉर्ड फॉर न्यू टॅलेंट: 1995 टीयर्स ऑफ अ टायगर . [११]











कार्य करते

संपादन
 
२०१५ मध्ये ड्रेपर

हेजलवूड हाय ट्रायोलॉजी

संपादन
  • टिअर्स ऑफ अ टायगर ( सायमन आणि शुस्टर, 1994)आयएसबीएन 9780689318788
  • फोर्ज्ड बाय फायर (S&S, 1997)आयएसबीएन 9780689806995
  • डार्कनेस बिफोर डॉन (S&S, 2001)आयएसबीएन 9780689830808

जेरिको मालिका

संपादन


स्वतंत्र कादंबऱ्या

संपादन

कविता

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ "Sharon M. Draper: Embracing Literacy" by KaaVonia Hinton, Scarecrow Studies in Young Adult Literature, 31, Scarecrow Press, 2008
  2. ^ Simon and Schuster Authors A-Z: Sharon M. Draper
  3. ^ a b c Hinton, KaaVonia (2008-12-04). Sharon M. Draper: Embracing Literacy (इंग्रजी भाषेत). Scarecrow Press. ISBN 9780810866539.
  4. ^ "In Conversation: Sharon M. Draper and Jason Reynolds". Publishers Weekly. October 2018 – Ebscohost द्वारे.
  5. ^ a b Hinton, KaaVonia (October 2008). "AUTHOR PROFILE: SHARON M. DRAPER". Library Media Connection. 27 (2): 42–43 – Ebscohost द्वारे.
  6. ^ a b "Sharon M. Draper | Encyclopedia.com". www.encyclopedia.com. 2019-11-06 रोजी पाहिले.
  7. ^ Communications, Emmis (October 1998). "Year Abroad". Cincinnati Magazine: 54–58 – Google Books द्वारे.
  8. ^ a b Castellitto, Linda M. (2015-01-01). "This is the sound of courage". BookPage (इंग्रजी भाषेत). 2019-11-26 रोजी पाहिले.[permanent dead link]
  9. ^ a b Draper, Sharon M. (Spring–Summer 2001). "Alex Haley, me, and a kid named Kyrus: a tale of cosmic connections". Obsidian III. 3 (1): 26+ – Gale Literature Resource Center द्वारे.
  10. ^ "Sharon M. Draper Books, Author Biography, and Reading Level | Scholastic". www.scholastic.com. 2019-11-06 रोजी पाहिले.
  11. ^ Ethnic and Multicultural Information Exchange Round Table (2012-04-05). "Coretta Scott King Book Awards - All Recipients, 1970-Present". Round Tables (इंग्रजी भाषेत). 2019-11-26 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

संपादन
  • अधिकृत संकेतस्थळ
  • Draper at Ohio Reading Road Trip
  • Sharon M. Draper (Sharon Mills) at Library of Congress, with 40 library catalog records