शेतीचे सूक्ष्म नियोजन

शेतीचे सूक्ष्म नियोजन म्हणजे पिक उत्पन्न देणाऱ्या/वाढविणाऱ्या प्रत्येक बाबींबर योग्य व काटेकोर नियोजन करणे आहे. हे नियोजन सहसा कोरडवाहू शेतीत केले जाते पण ओलिताच्या शेतीलाही नियोजनाचा फायदा होऊ शकतो.कोणत्याही गोष्टीचे नियोजन केले नाही तर, अपेक्षत परिणाम मिळत नाहीत व उत्पन्नात घट होते.[ संदर्भ हवा ]

सूक्ष्म नियोजनासाठी आवश्यक मुद्दे संपादन

पिक नियोजनासाठी खालील गोष्टींचे नियोजन करणे आवश्यक आहे:

पावसाचा/पाण्याचा उपयोग संपादन

पावसाचे कमी प्रमाण व भूगर्भातील पाण्याच्या पातळीत घट हे लक्षात घेऊन, पडणारा पावसाचा प्रत्येक थेंब जम्मिनीत जिरवावयास हवा.त्याचा जास्तीत जास्त वापर कसा करता येईल हे बघावयास हवे.[ संदर्भ हवा ]

पिकाची निवड संपादन

कमी पाण्यात येणाऱ्या पिकाची निवड करावयास हवी.[ संदर्भ हवा ]

पिक येण्याचा कालावधी संपादन

कमी कालावधीत येणाऱ्या वाणाची निवड करणे आवश्यक.त्यासाठी बाजरी, सोयाबीन मूग ही पिके घ्यावीत.[ संदर्भ हवा ]

जास्त पाणी आवश्यक असणारी पिके टाळणे संपादन

जास्त पाणी लागणारी पिके जसे ऊस, केळी इत्यादी पिकांची लागवड टाळावयास हवी. त्यामुळे कमी पाण्याअभावी पूर्ण पिकच हातचे जाऊ शकते.[ संदर्भ हवा ]

पाण्याचे बाष्पीभवन टाळणे संपादन

पीकास देण्यात येणारे पाणी याचे बाष्पीभवन टाळण्यासाठी मल्चिंग कागद टाकणे, तो उपलब्ध न झाल्यास, उसाचे चिपाड, गव्हाची काडे , भूसा इत्यादीचा वापर करावा. केळीची पाने देखील वापरता येतील.[ संदर्भ हवा ]

संदर्भ संपादन