क्राऊन ग्राफटिंग व बगलकलम या दोन्ही पद्धतीत झाडाच्या मोठ्या अवयवांना मुकावे लागते. शेंडेकलमात तसे मुकावे लागत नाही. या पद्धतीमध्ये झाडाच्या मुख्य फांद्या झाडाच्या मुख्य खोडापासुन अर्धा मीटर लांबी ठेवून कापून टाकतात. या छाटलेल्या फांद्यावर जातिवंत आंब्याची कलमे अनेक पद्धतीने करता येतात. नेहमीची व सर्वसामान्य प्रचारात असलेली पद्धत म्हणजे भेटकलमे करणे ही होय. या पद्धतीत छाटलेल्या फांद्याना नवीन धुमारे फुटून त्या नवीन फांद्यावर जातिवंत झाडाच्या कुंड्यामधल्या फांद्या भेटकलम पद्धतीने बांधतात. ही पद्धत किचकट व खर्चिक आहे. भेटकलमाऎवजी नवीन फुटीवर डोळे बांधणे सोयीचे , कमी खर्चाचे व सोपे असते.