शुक्राचार्य

(शुक्र उशनस् या पानावरून पुनर्निर्देशित)

शुक्र उशनस्, अर्थात शुक्राचार्य (अन्य नावे: उशनस काव्य) हे हिंदू पुराणांनुसार भृगूचा पुत्र व असुरांचा गुरू होते. ऋग्वेदातील उल्लेखांनुसार ते सूक्तद्रष्टा ऋषी होते. हिंदू फलज्योतिषानुसार शुक्र ग्रहाशी त्यांचे ऐकात्म्य मानले जाते.

शुक्र उशनसाचे शिल्प

वैवस्वत मन्वंतरातील पुरंदर इंद्राची कन्या जयंती ह्यांच्याशी शुक्राचार्यांचा विवाह झाला. त्यांच्यापासून जयंतीला देवयानी नामक कन्या झाली.

शुक्राचार्यांना संजीवनीविद्या प्राप्त असल्याने, असुरांचा राजा वृषपर्वा यांनी त्यांचे शिष्यत्व पत्करले व त्यांच्या त्या विद्येच्या आधाराने युद्धांत देवांचा वारंवार पराभव केला.