शिसव किंवा शिसवी (Fabaceae -pea, or legume- कुळातले आहे. भारतात शिसवीचे दोन प्रकार आढळतात. (१) Dalbergia sissoo (२) Dalbergia Latifolia (काळी शिसव) (Indian Rosewood)

हा २५ ते ३० मीटर उंच वाढणारा वृक्ष आहे. या वृक्षापासून मिळणाऱ्या लाकडास शिसवीचे लाकूड असे म्हणतात. सागापेक्षा टिकाऊ, दणकट, नक्षीकाम करण्यासाठी उत्तम अशा ह्या काळ्या रंगाच्या शिसवीच्या लाकडाने एकेकाळी महाल आणि वाडे बांधत असत. असल्या घरातील वातावरण उबदार असते. हे झाड लॅटिन नावातला sissoo हा शब्द शिसवी शब्दापासून निघाला आहे. Dalbergia हा शब्द स्वीडिश शास्त्रज्ञ निल्स व कार्ल डलबर्ग यांच्या नावांवरून घेतला आहे.

नेपाळ, पाकिस्तान आणि भारत हे देश या शिसवीच्या झाडाचे मूळ स्थान आहेत.

 सदर व्रुक्षाचे लाकूड फार वजनदार आसते

शिसवी वृक्षाची अन्यभाषिक नावे संपादन

 • इंग्रजी : Blackwood-tree, Indian dalbergia, Indian rosewood, shisham
 • कानडी : अगर
 • गुजराथी : સીસમ -सीसम
 • तमिळ : சிசே सिसे, ஈட்டிமரவகை इत्तिमरावकई, மரவகை मरवकई, நூக்கம் नुक्कम
 • तेलुगू :: ఇరుగుడుచెట్టు इरुगुडुसॆत्तू, శికుప सिकुपा, శింకవ सिंकवा, శింకువ सिंकुवा
 • पंजाबी : अगुरू, शिशपा
 • बंगाली : শিশ सिसू
 • मणिपुरी : सिस्सू
 • मराठी : शिसव किंवा शिंसव, शीशम, शिंसवा, शिसवी किंवा शिंसवी
 • शास्त्रीय लॅटिन नाव : Dalbergia sissoo
 • हिंदी : शीशम