शिवशाही (बस सेवा)
महाराष्ट्रातील मुंबई आणि कोल्हापूर तसेच मुंबई आणि पुणे शहरांमधील विनाथांबा वातानुकुलित बस सेव
शिवशाही ही महाराष्ट्रातील मुंबई आणि कोल्हापूर तसेच मुंबई आणि पुणे शहरांमधील विनाथांबा वातानुकुलित बस सेवा आहे.
ही सेवा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे चालवली जात असली तरी या मार्गावरील बस खाजगी कंत्राटदारांच्या असतात. महामंडळ कंत्राटदारास प्रति किलोमीटर १८ रुपये भाडे देते. याशिवाय इंधन, चालक आणि टोल यांसह इतर सगळे खर्च महामंडळाची जबाबदारी असते. प्रत्येक बसची प्रवासी क्षमता ४५ असून यात चालक हाच वाहकाचे काम करतो. पुणे-कोल्हापूर दरम्यानचे भाडे २०१७ च्या अखेरीस ६२० रुपये होते.[१]
बस पूर्ण भरली असता दर फेरीमागे महामंडळास अंदाजे २७,००० रुपये निव्वळ उत्पन्न मिळते. तोटा झाल्यास तो महामंडळाच्या पदरी पडतो.