हा हिंदी भाषेतील काव्यग्रंथ आहे.या ग्रंथाची रचना सुप्रसिद्ध कवी भूषण याने केली आहे.या काव्यग्रंथात शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे यथासांग विश्लेषण करण्यात आले आहे. कवी भूषण हा मूळचा उत्तरप्रदेशचा निवासी असून तो शिवाजी महाराजांची कीर्ती ऐकून त्यांच्या दरबारात आला होता.'शिवराज भूषण'या काव्यग्रंथात ५२ छंद आहेत.हे ५२ छंद असल्यामुळे ह्याला 'शिवा-बावनी'असे देखील म्हणतात. मराठ्यांच्या इतिहासाच्या साधनातील हा महत्त्वाचा घटक आहे.

संदर्भयादी संपादन