शिलाई यंत्र

(शिवणयंत्र या पानावरून पुनर्निर्देशित)

शिलाई यंत्र हे कपडे शिवण्याचे यंत्र आहे. यास शिवणयंत्र असेही म्हणतात. शिलाईयंत्राचा प्रथम शोध ए.वाईसेन्थ्ल यांनी इ.स. १७५५मध्ये लावला.

शिलाई यंत्र

१७९० मध्ये थॉमस सेंट यांनी दुसऱ्या शिलाई यंत्राचा शोध लावला. शिलाईयंत्र हे वस्त्रापासून कापड तयार करणे, घरगुती कापड शिवणे यासाठी वापरले जाते.

या मध्ये सुईच्या तोंडाशी नेढे असते ज्यामध्ये दोरा ओवला जातो व बॉबीन मधून एक दोरा येतो. दोन दोऱ्यांच्या सहाय्याने शिवणयंत्राने शिवले जाते.

हे यंत्र हाताने, पायाने किंवा विजेवर चालविता येते.

आधुनिक शिलाईयंत्रे विजेवर चालतात.