शाश्‍वत शेती (इंग्रजी:Sustainable Agriculture) म्हणजे जमीन, पिके, वने, पशुधन, वन्यजीव, मासे, पर्यावरण इत्यादी पुनःर्जीत करण्याजोगे स्रोतांच्या प्रतवारीचा घसारा न होऊ देता संतुलीत व्यवस्थापन करून वर्तमान व भावी पिढीसाठी अन्न, वस्त्र व निवारा यांचा पुरवठा करणे होय. शाश्‍वत शेतीला सेंद्रीय शेती, नैसर्गिक शेती, पर्यावरणीय शेती असेही म्हणतात. शाश्‍वत शेतीत पर्यावरण संतुलनाला जास्त महत्त्व दिले जाते. म्हणून तिला पर्यावरणीय शेती म्हणतात. शाश्‍वत शेतीसाठी अन्नद्रव्ये व्यवस्थापनासाठी सेंद्रीय पदार्थ मुख्य स्रोत म्हणून वापरतात. शाश्वत शेतीचा मूलमंत्र देत जगविख्यात कृषी तज्ञ व प्रगतशील शेतकरी वसंतराव नाईक याांनी शेती व शेतकरी हितासाठी संदेश दिला.

शाश्वत शेतीला सेंद्रिय शेती असेही म्हटले जाते. भावी पिढीला आवश्यक असणाऱ्या मूलभूत स्रोतांना कोणत्याही प्रकारची हानी पोहचू  न देता वर्तमान पिढीच्या गरजा भागवण्यासाठी अवलंबिण्यात आलेली शेतीची पद्धत होय.

शाश्वत शेतीचे फायदे व तोटे संपादन

  • पर्यावरणाचे संतुलन राखणे हा शाश्वत शेतीचा महत्त्वाचा फायदा आहे.
  • शाश्वत शेती साठी पिक उत्पादन खर्च कमी असतो.
  • शुद्ध पर्यावरण आणि कोणतीही हानिकारक अवशेष नसलेले अन्न उत्पादन शाश्वत शेतीद्वारे दिले जाते.
  • निव्वळ सामाजिक नफा जो असतो तो शाश्वत शेती पद्धतीत वाढतो.
  • प्रतिकूल हवामान व बाजार भावामुळे होणारे नुकसान शाश्वत शेतीद्वारे टाळता येते.

शाश्वत शेतीची व्याप्ती संपादन

शाश्वत शेती पद्धत अवलंबन्यासाठी पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन,एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन,कार्यक्षम पाणी व्यवस्थापन,एकात्मिक तण व्यवस्थापन, मूळ अनुवांशिक स्त्रोतांचे संवर्धन आणि एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन या व्यवस्थापन पद्धतीचा काटेकोरपणे वापर केला जातो.सदर व्यवस्थापन पद्धतीचा मूळ उद्देश म्हणजे मर्यादित रासायनिक निविष्ठा जास्तीत जास्त शेती उत्पादित निविस्थांचा वापर करून विना प्रदुषण व नैसर्गिक साधन संपतीला कोणतीही हानी ण पोहोचता शाश्वत उत्पादन घेणे हे आहे.

संदर्भ[१][२][३][४][५] संपादन

  1. ^ Doval, Calvin (2018-12-11). "What is Sustainable Agriculture?". Sustainable Agriculture Research & Education Program (इंग्रजी भाषेत). 2020-08-13 रोजी पाहिले.
  2. ^ "Sustainable agriculture". Wikipedia (इंग्रजी भाषेत). 2020-07-03.
  3. ^ "Introduction to Sustainable Agriculture". www.omafra.gov.on.ca. 2020-08-13 रोजी पाहिले.
  4. ^ Rockström, Johan; Williams, John; Daily, Gretchen; Noble, Andrew; Matthews, Nathanial; Gordon, Line; Wetterstrand, Hanna; DeClerck, Fabrice; Shah, Mihir (2017-2). "Sustainable intensification of agriculture for human prosperity and global sustainability". Ambio. 46 (1): 4–17. doi:10.1007/s13280-016-0793-6. ISSN 0044-7447. PMC 5226894. PMID 27405653. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  5. ^ King, F. H. (Franklin Hiram) (1 मार्च, 2004). Farmers of Forty Centuries; Or, Permanent Agriculture in China, Korea, and Japan. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)