शालेय समुपदेशन
विकिपीडियाचा दर्जा राखण्यासाठी या लेखास किंवा विभागास विकिकरणाची गरज आहे. उपयुक्त विकिदुवे देऊन या लेखाचे विकिकरण करण्यास कृपया मदत करा]. संक्षिप्त मार्गदर्शन दाखवा
|
शालेय समुपदेशनाची गरज
संपादनशाळा,अभ्यास,विद्यार्थी,शिक्षक व अभ्यासक्रम ह्या गोष्टीशिवाय शाळेमध्ये अनेक गोष्टी असतात. शाळेत पुस्तक, अभ्यास, अभ्यासक्रम व भविष्य घडवणाऱ्या शिक्षकांबरोबरच एक वेगळं नातं असतं ते समुपदेशकाचं. समुपदेशन आणि मराठी शाळा त्यातल्या त्यात खास करून जिल्हा परिषदेच्या शाळा आणि किशोरवयीन मुलांबरोबर काम करताना विद्यार्थी व विद्यार्थ्यांचे शारीरिक-मानसिक-सामाजिक आरोग्य या विषयावर काम करतात प्रत्येक शाळा, शाळेतील विद्यार्थी, शिक्षक ते अगदी शिक्षक कर्मचारी वर्गाशी संवाद साधला जातो. शालेय मुलांसाठी समुपदेशन ही महत्त्वाची गरज आहे.
शालेय समुपदेशनाचा इतिहास
संपादनसुरुवातीच्या कालावधीत शालेय समुपदेशन आणि किशोरवयीन आरोग्य हे विषय शाळा पर्यंत नेतानाची चढाओढ फार संघर्षमयी होती,काही शाळांनी स्वागत केले तर काहींनी रस्ते दाखविले, काहींनी कौतुक केले तर काहींनी झिडकारले पण हा प्रवास समरणीय आहे आणि तितकाच प्रेरणादायी आज जेव्हा पण शाळांमध्ये आम्ही जातो तेव्हा तेच भुवया उंचवणारे शिक्षक विचारतात काय मॅडम आज कोणता विषय घेणार, आमचे दोन विद्यार्थी त्याच सिक्रेट घेऊन आलेत, पण ते आम्हाला सांगणार नाही म्हणतात, तर मॅडम बघा बोलून ! असं काही ऐकायला मिळालं कि क्षणभर पुन्हा वळून पाहावं वाटत कारण समाजकार्य आणि समाजकार्य शिक्षण ही संघर्षमय वाटचाल आहे, इथं प्रत्येक क्षेत्रात नवा संघर्ष, अनुभूती, प्रचिती व आनंद आहे. सुरुवातीला ज्या शाळांमधून शून्य टक्के प्रतिसाद देणाऱ्या, दंगा करणाऱ्या, कधी कधी आमच्यावरच मिश्कीलपणे हसणाऱ्या विद्यार्थांचे डोळे, चेहरे व आवाज आज नव्या आत्मविश्वासाने आमच्या समोर मोकळे होतात, समस्या असो वा मनातील मळभ हे दूर करण्यासाठी विद्यार्थी कोणत्याना कोणत्या मार्गाने आमच्याजवळ पोहचतो मग तो मार्ग मोबाईलचा असो, सोशल मीडियाचा असो अथवा शाळांमधील समुपदेशन वर्गाचा आई वडील किंवा आपल्या मित्र मैत्रीण शिवाय समुपदेशक आपले मित्र मैत्रीण असू शकतात यावर विद्यार्थ्यांचा विश्वास बसू लागला आहे. आणि हीच आमच्या कामाची खरी पोहोच पावती आहे. खरं तर किशोरवयीन आरोग्य, जीवनशैली व समस्या ह्या रोजच्या दिवसाला वाढत आहेत,बाल्यावस्थेपासून ते वृद्धावस्थेपर्यंतच्या कालावधीत हा नाजूक कालावधी खूप गोंधळात टाकणारा असतो चांगले काय वाईट काय ? आपले कोण ?परके कोण ? प्रेम का आकर्षण किंवा मित्र समजू का आणि कोण अशा असंख्य गोंधळात अडकलेल्या किशोर किशोरीला त्याच्या मनात उद्भवणाऱ्या चांगल्या वाईट प्रश्नांना उत्तर मिळणे व योग्य रीतीने मैत्रीपूर्ण हाताळणे किती महत्त्वाचे असते हे एका समुपदेशकाच्या नजरेतून मांडणे गरजेचे आहे. प्रत्येक शाळा, शाळेचे वातावरण, शिस्त , नियम व विद्यार्थ्यांचे वयक्तिक आयुष्य यात मोठी रस्सीखेच असते. बरेचदा विदयार्थी शाळेच्या वातावरणात रमत नाहीत कधी आभ्यासात रमत नाहीत तर कधी बाहेरच्या गोष्टीच्या आकर्षणास बळी ठरतात तर काही वेळा वयाचा दोष कारणीभूत ठरतो यात दोषना शाळेचाना शाळेच्या वातावरणाचाना त्या विद्यार्थ्यांचा फक्त गोंधळ कुठे असतो तो बोलायचं कुठे? सांगायचं कसं आणि बोलल्यावर काय होईल या भोवती सगळे प्रश्न रेंगाळत राहतात.
आज बहुतांश शाळांमध्ये विशेषतः खाजगी शाळांमध्ये एक समुपदेशक, मानसशास्त्रज्ञ व मनोचिकित्सक नेमलेला असतो पण सरकारी शाळांपर्यंत या सुविधा हातापर्यंत मोजण्याइतपतच आहेत कदाचित, एखाद्या विद्यार्थ्यांचे नियमबाह्य वर्तन किंवा विचित्र वर्तन घडल्यास शाळा, पालक व विदयार्थी याचे जीवन त्रस्त होऊन जाते. बऱ्याचदा शिक्षा म्हणून विद्यार्थ्यांवर कार्यवाईपण होते पण हे सगळं शिस्त लागावी म्हणून केलं जात असताना, एखादा विद्यार्थी असं का वागतो किंवा त्याला स्वतःला काय अडचण आहे हे जाणून घेणं ही तितकंच गरजेचं आहे. शालेय समुपदेशन ही काळाची गरज आहे . समुपदेशन हे केवळ किशोरावस्थेतील विध्यार्थ्या साठीच वापरले जात नसून आज K.G to P.G सर्व स्तरांवर समुपदेशन वापरले जाते .एखादे मूल इतरांपेक्षा भिन्न आहे जाणून घेऊन, एक आरोग्यपूर्ण संवादाचे व्यासपीठ हे शालेय समुपदेशनाच्या माध्यमातून निर्माण करता येते. शाळा,शिक्षक, अभ्यासक्रम व मुलाचा विकास सगळ्यासाठी एक हक्काचे व्यासपीठ शालेय समुपदेशनाच्या माद्यमातून उभा करता येते. मग ती शाळा खाजगी असो अथवा शासकीय शालेय समुपदेशन हा शिक्षकाप्रमाणे एक शैक्षणिक पद्धतीचा भाग होऊ शकतो आणि विद्यार्थांसाठी त्याचे स्वतःचे मुक्त संवादाचे व्यासपीठ देऊ शकतो पण गरज आहे अधिकृत मान्यतेची शासकीय दरबारात विचार होण्याची. शालेय समुपदेशक हा प्रशिक्षितरित्या मुलांना त्याच्या विविध समस्या,अडचणी किंवा शारीरिक- मानसिक जडणघडणी मध्ये येणाऱ्या अडचणीसाठी मार्गदर्शन करत असतो अशा प्रकारचा समुपदेशक हा समाजकार्य म्हणजेच m.s.w. किंवा मानसशात्रामध्ये पदवीधर असला पाहिजे.