[१] गोव्यातील फोंडा तालुक्यातील सावई या गावात राजवटी ३० मार्च १९३५ या दिवशी  शारदा सावईकर यांचा जन्म झाला. त्यांचे आई वडील म्हणजे सरस्वतीबाई व पद्माकर सावईकर .लहानपानापासून देशप्रेमाचे बाळकडू त्यांना आपल्या घराण्यातूनच मिळाले. शारदा सावईकरांचे वडील पद्माकर सावईकर हे पारतंत्र्याविषयीची चीड बाळगणारे होते. त्यांच्या घरात गुप्तपणे लढ्याविषयीच्या  चर्चा व्हायच्या सावईकरांच्या घरात स्वातंत्र्यलढ्याविषयीचे  पोषक असे वातावरण होते .मोहन रानडे शारदा सावईकरांना मास्तर म्हणून लाभले. शारदा  सावईकरांमध्ये मुक्तीची क्रांतिकारी बीजे उगवण्यासाठी त्यांचे वडील पद्माकर,त्यांचे घरचे वातावरण, मोहन रानडे यांचे गुरू अत्यंत महत्वाचे ठरतात.

अगदी २० वर्षांच्या कोवळ्या वयात शारदा सावईकर पोर्तुगीजांकडून जुलमी अत्याचार सोसताना दिसतात. शारदा सावईकरांचा गोवा स्वातंत्र लढ्यातील सहभाग महत्वाचा आहे. त्याचबरोबर शारदा  सावईकरांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याने त्यांच्या जीवनकार्यात शिक्षक म्हणून त्यांनी पुण्यात तसेच गोमंतकीय शाळांना दिलेले योगदान महत्वाचे ठरते

  1. ^ तावरे, डॉ. स्नेहल. जागतिक स्थरावर संयुक्त म्ह्राष्ट्राची चळवळ आणि गोवा मुक्तीसंग्राम यांचे सांस्कृतिक योगदान. डॉ. स्नेहल तावरे.