शाहजहानपूर

उत्तर प्रदेशमधील एक शहर
(शहाजहानपूर या पानावरून पुनर्निर्देशित)

शाहजहानपूरचे नकाशावरील स्थान


शाहजहानपूर हे भारताच्या उत्तर प्रदेश राज्याच्या शाहजहानपूर ह्याच नावाच्या जिल्ह्याचे मुख्यालय आहे. शाहजहानपूर उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागात राजधानी लखनौच्या १८० किमी वायव्येस तर बरेलीच्या ७५ किमी आग्नेयेस स्थित आहे. २०११ साली शाहजहानपूरची लोकसंख्या सुमारे ३.५ लाख होती.

शाहजहानपूर
उत्तर प्रदेशमधील शहर
शाहजहानपूर is located in उत्तर प्रदेश
शाहजहानपूर
शाहजहानपूर
शाहजहानपूरचे उत्तर प्रदेशमधील स्थान

गुणक: 27°52′39″N 79°54′31″E / 27.87750°N 79.90861°E / 27.87750; 79.90861

देश भारत ध्वज भारत
राज्य उत्तर प्रदेश
जिल्हा शाहजहानपूर
समुद्रसपाटीपासुन उंची ६३६ फूट (१९४ मी)
लोकसंख्या  (२०११)
  - शहर ३,४६,१०३
अधिकृत भाषा हिंदी
प्रमाणवेळ यूटीसी+०५:३० (भारतीय प्रमाणवेळ)

मुघल सम्राट शाहजहानच्या दरबारातील एक सरदार दिलेर खान ह्याने १७व्या शतकात शाहजहानपूरची स्थापना केली व ह्या गावाला शाहजहानचे नाव दिले. ब्रिटिश राजवटीदरम्यान हिंदुस्तानी क्रांतीकाऱ्यांचे शाहजहानपूर हे एक सक्रीय केंद्र होते. राम प्रसाद बिस्मिल, रोशन सिंह इत्यादी क्रांतीकाऱ्यांचे जन्मस्थान हेच आहे.

राष्ट्रीय महामार्ग ३० शाहजहानपूरमधून धावतो. शाहजहानपूर रेल्वे स्थानक लखनौ-मुरादाबाद रेल्वेमार्गावरील एक महत्त्वाचे स्थानक आहे.