एस. पी. त्यागी हे भारतीय वायुसेनेचे प्रमुख होते. ऑगस्टा वेस्टलॅंड कंपनीकडून १२ हेलिकॉप्टरच्या ३ हजार ६०० कोटींच्या खरेदी गैरव्यवहार प्रकरणी यांच्यासह अकरा जणांवर आणि चार कंपन्यांवर केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयने दाखल केलेल्या 'एफआयआर'मध्ये त्यागींविरोधात फसवणूक आणि कट रचण्याचा आरोप करण्यात आला आहे.