शरीरसौष्ठव

(शरीरसौष्ठ्व या पानावरून पुनर्निर्देशित)

शरीरसैष्ठव(?) हा एक क्रीडा प्रकार आहे (?). याला इंग्रजीमध्ये बॉडीबिल्डींग अथवा शरीर बांधणी असे म्हणतात. यात मुख्यत्वे शरीराला व्यायाम देउन शरीराच्या स्नायूंना बळकट केले जाते. स्नायूंचा आकार व त्यांची सुडौलता, प्रमाणबद्धता व त्याचे सादरीकरण हे या क्रीडाप्रकारात महत्त्वाचे असते. मि. ऑलिंपीया ही या क्रीडा प्रकारातील सर्वोच्च स्पर्धा समजली जाते. आर्नोल्ड श्वार्झनेगर हे या क्रीडाप्रकारातील प्रसिद्ध शरीरसैष्ठवखेळाडू (?)आहेत. भारतातही हा क्रीडाप्रकाराने पुरातन कालिन तालमीतून आधुनिक जिममध्ये प्रवेश करून आधुनिक शरीरसैष्ठ्व (?)क्रीडाप्रकाराने चांगलेच मूळ धरले आहे. प्रेमचंद डोग्रा हे भारताचे प्रसिद्ध शरीरसैष्ठव खेळाडू आहेत.

२००८चा जागतिक शरीरसैष्ठव खेळाडू डेक्स्टर जॅक्सन

शरीरसैष्ठ्व (?)हा क्रीडा प्रकार नियमित व्यायामाचा पुढील प्रकार आहे. नियमित वजने उचलण्याच्या व्यायामाने प्रत्येकाला शरीरसैष्ठ्व (?)करता येते. तसेच शरीरसैष्ठवाने (?)बेढब शरीरालाही सुडौलता प्राप्त करून देता येते. परंतु जर शरीरसैष्ठ्व (?)खेळाडू व्हायचे असेल तर या व्यायाम प्रकारात जास्ती नियमता (?), भरपूर विश्रांती, व आहारावर नियंत्रण गरजेचे आहे. शरीरसैष्ठव (?)खेळाडूला आहारात प्रोटीनचा जास्त समावेश करावा लागतो.