शरीरक्रियाशास्त्र

जिवंत प्रणालींच्या कार्ये विज्ञान

शरीरक्रियाशास्त्र (इंग्लिश: Physiology, फिजिऑलजी / फिजिओलॉजी ;) हे शरीरशास्त्रांपैकी एक शास्त्र आहे. या शास्त्रामध्ये शरीरातील अववयांच्या क्रियांचा अभ्यास केला जातो. हे एक शास्त्र आहे की ज्यात मानवी शरीरातील अवयवांमधील भौतिक, रचनेतील, जैवरसायनिक बदलांचा पेशी स्तरापर्यंत अभ्यास केला जातो. शरीररचनाशास्त्र हे अवयवांच्या रचनेचा अभ्यास करते तर शरीरक्रियाशास्त्र अवयवांच्या कार्याचा अभ्यास करते.

ह्रदयातील रक्तप्रवाह

फिजिऑलजी हा शब्दाची उत्पत्ती युनानी भाषेतून झाली. लॅटीन भाषेत फिजिओलॉगिया म्हणतात. याचा प्रथमः वापर इ.स.च्या १६ शतकात झाला, परंतु त्याचा प्रत्यक्ष वापर इ.स.च्या १९ शतकात सुरू झाला. आँद्रेस विसिलियस याने इ.स. १५४३ साली फाब्रिका ह्युमानी कार्पोरीज़ हा ग्रंथ रचला. या ग्रंथाला शरीरक्रियाशास्त्राचे आद्य ग्रंथ मानले जाते.

इतिहास

संपादन


फिजीओलॉजीचा विकासातील मुख्य घटनांचे शिल्पकार

नाव काळ वर्ष महत्त्व

विसेलियस        1514-64 ई.     1543 ई.        आधुनिक युगाची सुरुवात्
हार्वि             1578-1667 ई.   1628 ई.        शरीरविज्ञान शाखेतील प्रयोगांना सुरुवात
मालपीगि          1628-1694 ई.   1661 ई.        शरीरविज्ञानात सुक्षदर्शकाचा वापर
न्यूटन            1642-1727 ई.   1687 ई.        आधुनिक शास्त्राचा विकास
हालर             1708-1777 ई.   1760 ई.        फिजीओलॉजीचे पहिले पाठ्यपुस्तक
लाव्वाज़्ये          1743-1794 ई.   1775 ई.        पेशीतील ज्वलन व श्वसन यांचा संबध
मूलर जोहैनीज      1801-1858 ई.   1834 ई.        महत्त्वपूर्ण पाठ्यपुस्तक
श्वान              1810-1882 ई.   1839 ई.        पेशी सिद्धांताची स्थापना
बेर्नार (Bernard)   1813-1878 ई.   1840-1870 ई.   महान प्रयोगांचा शोध
लूटविग (Ludwig)  1816-1895 ई.   1850-1890 ई.   महान प्रयोगवादी
हेल्महोल्ट्स     1821-1894 ई.   1850-1890 ई.   दृश्यपटला संबधी नवीन शोध

बाह्य दुवे

संपादन