रस (सौंदर्यशास्त्र)

जनी आर्जव तोडू नये पापद्रव्य जोडू नये पुण्यमाग्र सोडु नये कदाकळी
(शब्दांचा रस या पानावरून पुनर्निर्देशित)

रस (सौंदर्य) हे मनाची भावनिक स्थिती किंवा भावनांचा अभ्यास करणारे शास्त्र आहे,ज्यात प्रामुख्याने सादरीकरण असलेल्या कलांचा समावेश होतो.रस ही नाट्यशास्त्र, नाटक, अभिनय, साहित्य आणि संगीत ह्या कलाशाखांच्या संदर्भात वापरण्यात येणारी संज्ञा आहे.

भारतीय साहित्यविचारात रसविचारांची मांडणी प्रथम भरतमुनी यांनी केली. याचे विस्तारित विवेचन अभिनवगुप्त यांनी केले. एकूण नऊ रस आहेत. भारताने आठ रस व त्यांचे आठ स्थायीभाव सांगितले आहेत. पुढच्या अभ्यासकानी शांत हा नववा रस व त्याचा शांती हा स्थायी सांगितला आहे.

मनुष्याच्या ठिकाणी स्थिर व शाश्वत अशा भावना असतात. या स्थिर व शाश्वत भावनांना स्थायी भाव म्हणतात. हे स्थायी भाव म्हणजे रती, उत्साह, शोक, क्रोध, हास, भय, कंटाळा, विस्मय, शांती हे होय. हे सर्व स्थायी भाव कमीअधिक प्रमाणात प्रत्येकाच्या ठिकाणी असतात. हे स्थायीभाव चाळविले जाउन नऊ प्रकारचे रस निर्माण होतात.

१. शृंगार २. वीर ३. करुण ४. हास्य ५. रौद्र ६. भयानक ७. बीभत्स ८. अद्भुत ९. शांत

शृंगार

संपादन
  • शृंगार: ह्या रसात प्रामुख्याने स्त्री व पुरुष यांच्या एकमेकांबद्दल वाटणाऱ्या प्रेमाचा व आकर्षणाचा उल्लेख केलेला असतो. ह्या रसातून वैयक्तिक भावना जागृत होउन शृंगाररस निर्माण होतो.

उदा० १. या कातरवेळी सांज वेळी पाहिजेस तू जवळी.

२.सखे शेजारणी तू हसत रहा; हास्यात फुले गुंफित रहा.

३.दिवा जळे मम व्यथा घेऊनी असशील जागी तू ही शयनी.

हास्य

संपादन
  • हास्य: ह्या रसात प्रामुख्याने विडंबन, चेष्टा, विसंगती ह्यातून निर्माण होणारा विनोद किंवा आनंद वर्णन केलेला असतो. हा रस विनोदी नाटकांतून्, विनोदी पुस्तकातून जाणवतो.

रौद्र

संपादन
  • रौद्र: ह्या रसात प्रामुख्याने क्रोध व चीड ह्या भावना असतात.
  • करुण: ह्या रसात प्रामुख्याने दुःख ही भावना जाणवते. हृदयद्रावक अशा गोष्टीचे वर्णन ह्या रसामध्ये आढळते.

बीभत्स

संपादन
  • बीभत्स: बीभत्स रसात किळस, वीट, तिरस्कार ह्या भावना दिसतात.

भयानक

संपादन
  • भयानक: ह्या रसात भीती ही भावना जाणवते.

ज्या रसात भीति ही भावना जाणवते त्यास भयानक रस म्हणतात.

  • वीर : वीर रसात प्रामुख्याने पराक्रम, शौर्याचे वर्णन केलेले असते. ह्या रसात उत्साह हा स्थायीभाव असतो.

अद्भुत

संपादन
  • अद्भुत विस्मय हा ह्या रसाचा स्थायीभाव असतो. ह्यात प्रामुख्याने अलीबाबा आणि चाळीस चोर, अल्लाउद्दिन व जादूचा दिवा, अरेबियन नाईट्स, परीकथा अशा प्रकारच्या आश्चर्यकारक गोष्टींचे वर्णन असते.
  • शांत :ह्या रसात प्रामुख्याने भक्ती ही भावना असते. देवालये, आश्रम याठिकाणी शांतता असते. हा रस भूपाळी, अभंग यात असतो