शंतनू नारायण (२७ मे, इ.स. १९६३:हैदराबाद, तेलंगण, भारत - ) हे ॲडॉबे सिस्टिम्स या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी-सीईओ आहेत.

शंतनू नारायण यांचे शिक्षण

संपादन

उस्मानिया युनिव्हर्सिटीमधून बी.ई. केल्यानंतर त्यांनी अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठातून एम.बी.ए आणि नंतर ओहायोच्या बोलिंग ग्रीन स्टेट युनिव्हर्सिटीमधून एम.एस‌‍सी केले.

कारकीर्द

संपादन

शंतनू नारायण यांनी ॲपल या संगणक कंपनीमधून करिअरला सुरुवात केली. त्यांनी नंतर महाजालाटवर डिजिटल फोटो शेअरिंगची संकल्पना सर्वप्रथम प्रत्यक्षात आणणारी पिक्ट्रा‘ कंपनी स्थापन केली.[ संदर्भ हवा ]

शंतनू नारायण यांनी १९९८ मध्ये ॲडॉब सिस्टिम्स कंपनीत काम करायला सुरुवात केली व १ डिसेंबर २००७ रोजी ते कंपनीचे सीईओ झाले.