शंकर कऱ्हाडे
(शंकर कर्हाडे या पानावरून पुनर्निर्देशित)
विदर्भ साहित्य संघाच्या १-२ डिसेंबर २०१७ या दिवसांत अकोला येथे भरलेल्या पाचव्या बालकुमार साहित्य संमेलनाचे अध्यक्ष शंकर कऱ्हाडे हे बुलढाणा येथे स्थायिक असून, ख्यातनाम बालसाहित्यिक आहेत. ‘विदर्भाचे सानेगुरुजी’ म्हणून ते ओळखले जातात. शंकर कर्ऱ्हा यांना चरित्रलेखनाबद्दल राज्य पुरस्काराने सतत तीन वेळा सन्मानित केले आहे.
शंकर कऱ्हाडे यांच्या कथासाहित्याचा समावेश पाठ्यपुस्तकांत व विद्यापीठ अभ्यासक्रमात आहे. त्यांना २०१० सालचा राज्य शासनाचा उत्कृष्ट वाड्मय पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्यांची ३३हून अधिक पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. ‘ओपन टू क्लोज’ या बालनाटकासह त्यांच्या अनेक कथा व लेख प्रकाशित झाले आहेत.
शंकर कऱ्हाडे यांची पुस्तके
संपादन- नवभारताचे शिल्पकार ए.पी.जे. अब्दुल कलाम
- ओपन टू क्लोज (बालनाट्य)
- ओम नमः शिवाय (कृष्णामहाराज यांचे चरित्र)
- गोष्टीरूप चाचा नेहरू
- गोष्टीरूप महात्मा फुले
- गोष्टीरूपी लालबहादूर
- गोष्टीरूप हेडगेवार
- थोरांचे बालपण
- दलितांचे बाबा
- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
- मदर तेरेसा
- महात्मा फुले
- मार्टिन ल्युथर किंग
- मुलांच्या सकारात्मक बदलासाठी संस्कार गोष्टी
- लालबहाद्दूर
- वासुदेव बळवंत फडके
- संस्कार गोष्टी (बालसाहित्य)
- संस्कारकथांतून मुलांचा विकास
- सावरकर
पुरस्कार आणि सन्मान
संपादन- विदर्भ साहित्य संघाच्या पाचव्या बालकुमार साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद
- चरित्रलेखनाबद्दल तीन वेळा राज्य पुरस्काराने सन्मानित
- विदर्भाचे सानेगुरुजी म्हणून ओळख