शंकरपाळे हा खाद्यपदार्थदिवाळीत बनवला जाणारा खास महाराष्ट्रीय पक्वान्न आहे. शंकरपाळे हे आकाराने लांबट चौकोनी असतात. शंकरपाळे हे चवीने गोड, तिखट आणि खारट असे बनवतात. हा खाद्यपदार्थ मैद्यापासून बनवला जातो.

सहित्यः-

-१ किलो रवा

-२ वाटी तुप किवा डालडा (वन्सपति तुप)

-३ वाटी साखर

-अर्धा चमचा मिठ

-१ चमचा बेकिंग पावडर
-१ वाटी दुध  

तेल

कृती :

प्रथम १ वाटी दुध सामन्य तापमानाला गरम करून घ्या. २ वाटी तुप किवा डालडा (वन्सपति तुप) सामन्य तापमानाला गरम करून त्यात ३ वाटी साखर विरघळून घ्या.त्यात सामन्य तापमानाला गरम केलेले १ वाटी दुध ,अर्धा चमचा मिठ ,१ चमचा बेकिंग पावडर मिक्स करा. त्यात १ किलो रवा मिक्स करा. सर्व मिश्रन व्यवस्थित मळून घ्या.त्याचा १ लहान गोळा घेऊन त्याची गोल आकारात पोळी करून घ्या . त्याचे लहान लहान त्रिकोणी आकारात तुकडे करून घ्या. सर्व मिश्रन संपेपर्यंत तिच कृती परत परत करा . सर्व लहान काप करून झाल्यावर तेल गरम करून त्यात लहान काप व्यवस्थित तलुन घ्या. लालसर रंग येईपर्यंत व्यवस्थित तळुन घ्या . अशा प्रकारे कुसकुशीत शंकरपाळी तयार झाली .