साचा:ध्वनीचित्र हवे हे मराठी भाषेतील ....वे व्यंजनोच्चार वर्ण चिन्ह आहे.

उच्चारण संपादन

'श'चा उच्चार तालव्य आहे. टाळू व जीभ यांचा एकमेकांशी स्पर्श होऊन मुखातून हा उच्चार निघतो.

इचुयशानां तालु असे संस्कृत सूत्र आहे. अर्थ : इ-ई, च, छ, ज, झ, ञ आणि श ही तालव्य व्यंजने आहेत.

लेखन संपादन

खालील चित्रातील 'श'चे लेखन तीन प्रकारे दाखवले असले तरी त्यांचा उच्चार सारखाच आहे. त्यांपैकी शेंडीफोड्या 'श' हा लेखन प्रकार महाराष्ट्र शासन प्रमाणित आहे.

इतिहास संपादन

ब्राह्मी लिपी ते देवनागरी असा अक्षराचा प्रवास या विभागात लिहून विभागाचा विस्तार करण्यात साहाय्य करावे.

श्र, वगैरे संपादन

श्र हे जोडाक्षर आहे, शृ नाही.

श+र ह्यांच्या मिळून होणारे श्र हे विशेष जोडाक्षर चिन्ह आहे. 'श'ला एक शेपटा आहे. 'श'च्या स्वरदंडाला तिरप्या रेघेने 'र' जोडायचा प्रयत्न केला की ती तिरपी रेघ 'श'च्या शेपट्याला चिकटण्याची शक्यता असते. असे झाले तर एक विचित्र अक्षर तयार होईल. त्यामुळे आपल्या पूर्वजांनी असल्या कामासाठी एका वेगळ्या 'श'ची निर्मिती केली. त्या 'श'ला काना, मात्रा, वेलांटी, उकार, ऋकार लावता येतात आणि र. ल, व, म, न,च ही अक्षरेही सहज जोडता येतात. या नव्या 'श'ला शेपटा नसल्याने अक्षरे जोडताना शेपट्याचा अडथळा होत नाही. त्यामुळे श्र, श्रा. श्रे, श्रि. श्री, श्रु, श्रू, श्रे, शृ, श्ल, श्व, श्म, श्न(श+न), श्‍च, वगैरे अक्षरे सहज बनतात.

इ-ई, झ, द, र, स, ह आणि क्ष यांनाही शेपटे आहेत. पण तसे शब्द मराठीत नसल्याने, इ-ई, र, क्ष यांना तिरप्या रेघेचा 'र' लावायची गरज नसते, 'झ' आणि 'स' या अक्षरांना मध्ये दांडा असल्याने जोडलेला तिरप्या रेघेचा 'र'चा शेपट्यांना स्पर्श होण्याची शक्यता कमी असते. उदा० झ्र आणि स्र. ’द’च्या बेचक्यात आणि 'ह'च्या वाटीत तिरप्या रेघेचा 'र' सहज बसतो. उदा० द्र, ह्र. ’त’आणि ’क’ यांना ’र’ जोडायच्या खास युक्त्या आहेत. त्र आणि क यावरून श्र किंवा शृ मधला हा खास 'श' 'तसा' असणे किती जरुरीचे होते ते लक्षात यावे. हा खास 'श' कळफलकावर हवा. 'श्र' असणे अजिबात गरजेचे नाही.

'श्र'चे शब्द : श्रम(परिश्रम, आश्रम, सश्रम, विश्राम), श्रद्धा(अश्रद्ध, सश्रद्ध), विश्रब्ध, श्रमण, श्रमणक, मिश्र(मिश्रित, मिश्रण, संमिश्र, व्यामिश्र), आश्रय(आश्रित, निराश्रित, आश्रयदाता, आश्रयस्थान), श्रवण, श्रांत(अविश्रांत, विश्रांती), श्राद्ध, श्राप (अश्राप), मेश्राम, श्रावण, श्राव्य(सुश्राव्य), श्रावस्ती, श्री, श्रीकांत, श्रीकृष्ण, श्रीधर, श्रीनिवास, श्रीमती, श्रीमान, श्रीमुख, श्रीयुत, श्रीलंका, श्रीवर्धन, श्रुजबरी, श्रुत, श्रुती, अश्रू(अश्रूपात, नक्राश्रू, नयनाश्रू, साश्रुनयन), मश्रूम, शुश्रूषा, श्रेणी, श्रेय(श्रेयस, श्रेयस्कर), श्रोणी, श्रोता, श्रोतृगण, श्रोतृवृंद, श्रोतृसमुदाय, श्रौतसूत्रे, वगैरे.

'शृ'चे शब्द : शृंगार(शृंगारिक, शृंगारसाधने, शृंगारपेटी), शृगाल, शृंगापत्ती, शृंगी, चतुःशृंगी, सप्‍तशृंगी, हृष्यशृंग, वगैरे.

'श्व'चे शब्द : अश्व, विश्व, विश्वास, श्वान, पार्श्व, वगैरे.

‘श्न'चे शब्द : अश्नाति, प्रश्न, शिश्न, वगैरे.

'श्म'चे शब्द : अश्म, कश्मकश, रश्मी, दुश्मन, वगैरे.

'श्ल'चे शब्द : श्लाघा, आश्लेषा, अश्लील, श्लेष्मा, वगैरे.

'श्च'चे शब्द : आश्चर्य, पश्चात् , पुनश्च, कश्चित्, वगैरे.

’श्रृ’चा शब्द : एकही नाही !!....

==हे सुद्धा पहा=श्रृंगार

संदर्भ संपादन

[महाराष्ट्र शासनाचे परिपत्रक] (टायनीयूआरएल.काॅम/वाय8पीझेडईटी3) येथे आहे..

हे सुद्धा पहा :-