व्हॉट केम ऑफ पिकिंग फ्लॉवर्स

पोर्तुगीज परीकथा

व्हॉट केम ऑफ पिकिंग फ्लॉवर्स (फुले तोडण्याने काय झाले) ही एक पोर्तुगीज परीकथा आहे. ती प्रथम टेओफिलो ब्रागा यांनी क्रॅव्हो , रोजा ए जॅस्मिन या नावाने जमा केली.[] अँड्र्यू लँगने ते ग्रे फेयरी बुकमध्ये समाविष्ट केलेली आहे.

एच जे फोर्ड - व्हॉट केम ऑफ पिकिंग जेसामाइन

परिकथेचा सारांश

संपादन

एका महिलेला तीन मुली होत्या. एके दिवशी, एकीने गुलाबी कार्नेशन (एका प्रकारचे फुल) उचलले आणि गायब झाली. दुसऱ्या दिवशी, दुसरीने, तिच्या बहिणीला शोधत असताना, एक गुलाब उचलला आणि ती पण गायब झाला. तिसऱ्या दिवशी, तिसरीने काही जॅस्मिन (फुले) उचलली आणि ती सुद्धा गायब झाली. या महिलेने फार वेळ आक्रोश केला. तिचा मुलगा, त्याच्या बहिणी गायब झालेल्या दिवशी फक्त एक मुलगा, पण तो मोठा माणूस झाला. त्याने काय झाले ते विचारले तेव्हा त्याच्या आईने त्याला त्याच्या बहिणींबद्दल सांगितले. त्याने तिचा आशीर्वाद मागितला आणि त्यांना शोधायला निघाला.

रस्यात त्याला तीन मोठी मुले त्यांच्या वारशा हक्काबद्दल भांडताना दिसली. त्यात तीन गोष्टी होत्या. बूट, जो माणूस ते घालेल तो कुठेही जाऊ शकत होता, प्रत्येक कुलूप उघडणारी चावी आणि अदृश्य करणारी टोपी. मुलाने सांगितले की तो एक दगड टाकेल आणि ज्याला तो प्रथम मिळेल त्याला तिनही गोष्टी मिळतील. त्याने एक दगड फेकला आणि तीनही वस्तू चोरून पसार झाला. बुट घालुन त्याने त्याची सर्वात मोठी बहीण असणाऱ्या ठिकाणी जायची ईच्छा व्यक्त केली. तो डोंगरावरील एका मजबूत किल्ल्यासमोर प्रकट झाला. त्याने त्याच्याकडे असलेल्या चावीने सर्व दरवाजे उघडले. त्याला त्याची बहीण भरपूर जरतारी कपडे घातलेली आढळली. परंतु तिला एकच दुःख होते: तिचा नवरा एका शापाखाली होता. दरम्यान तिचा नवरा परत येतो. तिचा मुलगा टोपी घालतो आणि अदृश्य होतो. नवरा त्याच्या बायकोला दुसऱ्या माणासाबरोबर बघून भडकतो. त्याचा मुलगा त्याची टोपी काढून टाकतो आणि त्याला खर सांगतो. त्या दोघांच्या दिसण्यात असलेल्या साम्याने त्याला खात्री पटते की ते खरोखरच भाऊ आणि बहीण आहेत. त्यावर खूश होऊन त्याला एक पंख देतो. ज्यामुळे तो स्वतःला, पक्ष्यांचा राजा म्हणू शकेल.

दुसऱ्या दिवशी, तो त्याच्या दुसऱ्या बहीणीला भेटतो. तिला एक त्रास असतो कि तिच्या पतीला अर्धा दिवस मासा बनण्याचा शाप असतो. तिचा पती माशांचा राजा असतो. तो त्याला बोलावण्यासाठी एक पट्टी देतो.

 
ऑर्थर रॅकहॅमचे चित्रण, १९१६ मधील द अलाईज फेयरी बुकमधून . पक्षी त्या तरुणाला पांढऱ्या कबुतराचे घरटे दाखवतात.

दुसऱ्या दिवशी, तो त्याच्या सर्वात धाकट्या बहीणीला भेटतो. जिला एका राक्षसाने पळवून नेलेले असते. ति फार दुःखी असते. तिने त्याच्याशी लग्न करण्यास नकार दिलेला असतो. तिचा भाऊ तिला सल्ला देतो कि तू त्याच्याशी लग्न करायला तयार्क हो. पण त्यापूर्वी त्याच्या कडून त्याच्या मरणाचे रहस्य विचारून घे. तो राक्षस तिला सांगतो कि, समुद्राच्या तळाशी असलेल्या लोखंडी डब्यात एक पांढरे कबूतर आहे आणि जर त्या कबुतराचे अंडे त्याच्या डोक्यावर लागले तर तो मरून जाईल. भाऊ दुसऱ्या बहिणीच्या नवऱ्याला सांगुन त्याला पेटी आणायला सांगतो. ती उघडण्यासाठी स्वतःकडील चावी वापरतो. पक्ष्यांच्या राजाने दिलेल्या पंखाच्या मद्तीने कबुतराला अंडी आणायला सांगतो. सर्वात धाकट्या बहिणीला राक्षसाला त्याचे डोके तिच्या मांडीवर ठेवण्यास सांगतो. त्या वेळेस तो भाऊ अंडी त्याच्या डोक्यावर फोडतो आणि त्याला मारतो.

या मदतीउळे त्याच्या दोन्ही मेव्हण्यांचा शाप संपतो आणि ते परत माणुस बनतात. राक्षसाकडे असलेल्या खजिन्याने सर्वात लहान बहिणीला आयुष्यभर श्रीमंत केले.

भाषांतरे

संपादन

अँड्र्यू लँग यांनी द ग्रे फेयरी बुकमध्ये रंगीत फेयरी बुक्सच्या परीकथेच्या संकलनाचा भाग म्हणून या कथेचा समावेश केला.[]

आर्थर रॅकहॅमच्या चित्रांसह द अलाईज फेयरी बुक (१९१६) मध्ये या कथेचा समावेश करण्यात आला होता.[]

विश्लेषण

संपादन

ही पोर्तुगीज कथा इटालियन साहित्यिक कथा द थ्री एनचांटेड प्रिन्सेसशी साम्य सामायिक करते, ज्यामध्ये एका राजाला त्याच्या मोठ्या मुलींना शापाखाली असलेल्या तीन प्राण्यांच्या स्वाधीन करण्यास भाग पाडले जाते.

हे सुद्धा पहा

संपादन
  • तीन मंत्रमुग्ध राजकुमार
  • कोशेई द डेथलेसचा मृत्यू
  • ड्रॅगन आणि प्रिन्स
  • द फेअर फिओरिटा
  • राक्षस ज्याच्या शरीरात हृदय नव्हते
  • कावळा
  • द सी-मेडेन
  • राजा ओ'हाराच्या तीन मुली
  • व्हाइटलँडच्या तीन राजकन्या
  • ईसाइध रुआधचा तरुण राजा

संदर्भ

संपादन
  1. ^ Braga, Teophilo. Contos tradicionaes do povo portuguez. Magalhães e Moniz. 1883. pp. 20-24.
  2. ^ Lang, Andrew. The Grey Fairy Book. New York: Longmans, Green. 1905. pp. 93-102.
  3. ^ The Allies fairy book. Illustrated by Arthur Rackham. Philadelphia: J. B. Lippencott co. 1916. pp. 77-83.

बाह्य दुवे

संपादन