व्हेसुव्हियस
व्हेसुव्हियस हा इटलीच्या पूर्व भागात नेपल्सजवळ असलेला ज्वालामुखी पर्वत आहे. हा युरोपातील एकमेव जागृत ज्वालामुखी म्हणून ओळखला जातो परंतु तो सध्या निद्रित अवस्थेत आहे. इ.स. ७९मधील व्हेसुव्हियसच्या उद्रेकामुळे पॉम्पेई व हर्क्युलेनियम ही प्राचीन शहरे पूर्णपणे नष्ट झाली होती.