व्हीनस फ्लायट्रॅप (मक्षिका-पंजर)(शब्दशः अर्थ : ‘व्हीनसचे कीटक जाळे’) ही एक मांसाहारी वनस्पती आहे. ही वनस्पती प्राण्यांना आपल्या जाळ्यात अडकवून त्यांना ‘पचवते’. हिच्या भक्ष्यांमध्ये मुख्यत: उडणाऱ्या व अष्टभुज कीटकांचा समावेश असतो.

महान जीवशास्त्रज्ञ चार्ल्स डार्विनने अशा वनस्पतींबद्दल ‘इन्सेक्टिव्होरस प्लॅन्ट्‌स’(कीटकभक्षक वनस्पती) हे पुस्तक लिहिले. अशा वनस्पतींसाठी पहिल्यांदाच ही संज्ञा वापरली गेली.