व्यावसायिक अर्थशास्त्र

कोणत्याही देशाचा विकास हा त्या देशातील व्यवसायाच्या विकासावर अवलंबून असतो. व्यवसाय विकास म्हणजे समाज विकास होय कारण समाजाला लागणाऱ्या गरजांची पूर्ती करण्याचे कार्य व्यवसाय करीत असतात. त्या दृष्टीने व्यवसायाचे व्यवस्थापन शास्त्रीय पद्धतीने झाल्यास व्यवसाय विकास जलदगतीने घडून येतो. व्यवसायात शास्त्रीय व्यवस्थापनाचा अवलंब किल्यास व्यावसायिक कामगार, ग्राहक व सरकार या सर्वांनाच त्यापासून लाभ प्राप्त होतात याला महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. व्यवस्थापनास महत्त्वाचे स्थान प्राप्त होण्यासाठी पुढील मुद्दे अधिक समर्थनीय आहेत.

व्यवस्थापनाचे महत्त्व:-

(१) _आधुनिक काळात व्यवस्थापकीय कार्याचे वाढते महत्त्व_ :-

          औद्योगिक क्रांतीपूर्वी उत्पादन प्रक्रियेत भूमी, भांडवल, श्रम या घटकांना अधिक महत्व होते. या घटकांच्या साह्याने होणारे उत्पादन सीमित प्रमाणावर होत असल्यामुळे व्यवसायाच्या व्यवस्थापकाला सीमित कार्ये पार पाडावी लागत असत परंतु विसाव्या शतकात औद्योगिक विकास झपाट्याने वाढत गेला. शेअर बाजार, अधिकोष व स्कंध प्रमंडळाच्या वाढत्या विकासाबरोबर उत्पादनाचे पूर्वीचे घटकांचे महत्व कमी झाले परंतु ह्या काळात उत्पादनाचे कार्य अत्यंत तांत्रिक व गुंतागुंतीचे बनल्यामुळे व्यवस्थापनाचे महत्त्व अनेक पटींनी वाढले 

आधुनिक काळात व्यवस्थापनाला उत्पादनाचे प्रमुख अंग मानले गेल्यामुळे व्यवस्थापनाला महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. व्यवसायाची प्रगती, विकास व विस्तार हा व्यवस्थापकीय घटकांवर अवलंबून आहे हे शास्त्रीय पद्धतीने सिद्ध झाल्यामुळे व्यवस्थापनास महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे.

(२) ‌_यशस्वी संचालनाकरिता_ :-

                      व्यवसायाचा आकार व स्वरूप यावर व्यवसायाचा विकास अवलंबून नसून त्या व्यवसायातील यशस्वी संचालन महत्त्वाचे असते. उप्रकमाच्या यशस्वी संचालनाच्या दृष्टीने व्यवस्थापकाचे कार्य हे विशेष महत्त्वाचे असते. वाढत्या व्यवसाय विकासाबरोबर व्यवस्थापकीय कार्याचे महत्त्व कमी होत नसून ते अधिकच वाढत जाते. गती प्राप्त झालेल्या व्यवसायांना सुद्धा नियमित उद्दीपनाची (Stimulus) आवश्यकता असते. उपक्रमात कार्य करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना प्रेरित करून सोपविलेले कार्य त्यांच्याकडून व्यवस्थितपणे करवून घेण्याची जबाबदारी व्यवस्थापकांची असते. त्या कारणांमुळेच व्यवस्थापनाचे कार्य महत्त्वाचे आहे.

(३) _व्यवसायाची कार्यक्षमता वाढविणे_:-

      ‌‌   ‌‌                व्यवस्थापन उत्पादन प्रक्रियेत नवचैतन्य निर्माण करण्याचे कार्य करीत असते. उत्पादन कार्यात अनेक घटकांचे सहाय्य असते. या सर्व घटकांकडून कामे करवून घेण्याचे कार्य व्यवस्थापनाचे असते. त्यामुळे व्यवसायात व्यवस्थापन जेवढे कार्यक्षम राहील तेवढीच त्या व्यवसायाची कार्यक्षमता वाढेल. दुसऱ्यांकडून कामे करवून घेण्याची कला किंवा शास्त्र व्यवस्थापकास अवगत असल्यामुळे तो ही सर्व कार्ये बिना अडचणीने पार पाडून घेऊ शकतो. व्यवस्थापकाच्या कार्यक्षमतेवर व कौशल्यावर व्यवसायाचे यश बऱ्याच प्रमाणावर अवलंबून असते. त्या दृष्टीने व्यवस्थापन महत्त्वाचे आहे.

(४)_व्यवसायाचे अस्तित्त्व टिकवून ठेवणे_:-‌

                           व्यवसाय प्रारंभीच्या काळातील 'विक्रेत्यांची बाजारपेठ' जाऊन आज 'ग्राहकांची बाजारपेठ' निर्माण झालेली आहे. बाजारपेठेत अत्यंत तीव्र स्पर्धा निर्माण झाल्यामुळे विशाल प्रमाणावरील उत्पादित वस्तूंची विक्री कशी करावी याबाबत उत्पादक वर्ग चिंतित झाला आहे. स्पर्धेच्या काळात व्यावसायिकास आपल्या व्यवसायाचे अस्तित्त्व टिकवून ठेवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करावे लागतात. अशा परिस्थितीत व्यवसाय संचालनाचे कार्य पूर्वीसारखे साधे न राहता गुंतागुंतीचे व किचकट झाले आहे. यातून मार्ग काढण्याकरिता कुशल व कार्यक्षम व्यवस्थापकाची गरज निर्माण झाली आहे. या व इतर कारणांमुळेच आज व्यवस्थापनाचे महत्त्व वाढले आहे.

व्याख्या

संपादन

व्यावसायिक अर्थशास्त्र म्हणजे काय हे समजण्यासाठी वेगवेगळ्या अर्थ्शास्त्रज्ञांनी व्याख्या पुढील प्रमाणे दिल्या आहेत.

स्पेन्सर व साइगलमनच्या मते, "व्यावसायिक परिस्थितीच्या विश्लेक्षणासाठी अर्थशास्त्रीय कल्पनांचा उपयोग करणे म्हणजे व्यावसायिक अर्थशास्त्र होय."

ई. टी. ब्रिहाम व जे.एल. पपास यांच्या मते, "व्यावसायिक कृतींना अर्थशास्त्रीय सिद्धांत व पद्धती लागू करणे म्हणजे व्यावसायिक अर्थशास्त्र होय." म्हणजेच व्याव्स्थापकेला दैनंदिन जीवनामध्ये जे व्यावसायिक प्रश्न असतात ते सोडवण्यासाठी अर्थशास्त्राची मदत होते. व्यावसायिक निर्णयांसाठी याचा वापर होतो. व्यावसायिक अर्थशास्त्राचा राष्ट्रीय उत्पन्न, सरकारी धोरणे, आंतरराष्ट्रीय व्यापार, इत्यादी स्थूल घटकांशी संबंधीत आहे. तसेच अर्थव्यवस्थेतील विशिष्ट घटकांचा आभ्यास देखील व्यावसायिक अर्थशास्त्रात होतो. अशा रितीने व्यावसायिक अर्थशास्त्राच्या अभ्यासात सूक्ष्मलक्षी व समग्रलक्षी अर्थशास्त्राचा समावेश होतो.