वॉशिंग्टन, डी.सी.

(वॉशिंग्टन, डी.सी या पानावरून पुनर्निर्देशित)


वॉशिंग्टन, डी.सी. (इंग्लिश: Washington, D.C.; अधिकृत नावः डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबिया, District of Columbia) ही अमेरिका देशाची राजधानी आहे. १६ जुलै १७९० रोजी अमेरिकन काँग्रेसने राष्ट्रीय राजधानीसाठी एक संघीय जिल्हा निर्माण करण्यास मान्यता दिली. त्यानुसार मेरीलँडव्हर्जिनिया राज्यांच्या मधे पोटॉमॅक नदीच्या काठावरील एका जमिनीच्या तुकड्यावर वॉशिंग्टन, डी.सी. शहर वसवले गेले. ह्या शहराला अमेरिकेचा पहिला राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टनचे नाव देण्यात आले. डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबिया हा कोणत्याही राज्याचा भाग नसून एक स्वतंत्र जिल्हा आहे व अनेक वेळा त्याला अमेरिकेचे ५१वे राज्य असे मानले जाते.

वॉशिंग्टन डी.सी.
Washington, D.C.
अमेरिका देशाची राजधानी

DCmontage4.jpg
डावीकडे-वरः जॉर्जटाउन विद्यापीठ, उजवीकडे-वरः अमेरिकन कॅपिटल
Flag of the District of Columbia.svg
ध्वज
Seal of the District of Columbia.svg
चिन्ह
Washington, D.C. locator map.svg
वॉशिंग्टन डी.सी.चे अमेरिकामधील स्थान

गुणक: 38°53′42.4″N 77°02′12.0″W / 38.895111°N 77.036667°W / 38.895111; -77.036667

देश Flag of the United States अमेरिका
जिल्हा डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबिया
स्थापना वर्ष १६ जुलै १७९०
महापौर व्हिन्सेंट ग्रे
क्षेत्रफळ १७७ चौ. किमी (६८ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ४०९ फूट (१२५ मी)
लोकसंख्या  (२०११)
  - शहर ६,१७,९९६
  - घनता ३,८८६ /चौ. किमी (१०,०६० /चौ. मैल)
  - महानगर ५५.८ लाख
प्रमाणवेळ यूटीसी - ५:००
www.dc.gov

२०११ साली ६.१८ लाख लोकसंख्या असलेले वॉशिंग्टन हे अमेरिकेमधील २४व्या क्रमांकाचे मोठे शहर तर ५५.८ लाख लोकवस्ती असलेले महानगर क्षेत्र देशात सातव्या क्रमांकावर आहे. अमेरिकन सरकारच्या तीनही प्रशासकीय शाखा (संसद, राष्ट्राध्यक्ष व न्यायालय) वॉशिंग्टन शहरातच स्थित आहेत. तसेच येथे जगातील १७६ देशांचे दूतावास, जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी व इतर अनेक जागतिक संस्थांची मुख्यालये स्थित आहेत. ह्या व्यतिरिक्त येथे अनेक ऐतिहासिक संग्रहालये व वास्तू आहेत.


इतिहाससंपादन करा

भूगोलसंपादन करा

हवामानसंपादन करा

प्रशासनसंपादन करा

जनसांख्यिकीसंपादन करा

अर्थव्यवस्थासंपादन करा

वाहतूकसंपादन करा

वॉशिंग्टन मेट्रो ही भुयरी रेल्वे वॉशिंग्टन, डी.सी. शहर आणि उपनगरांना जोडणारी रेल्वेसेवा आहे.

संस्कृतीसंपादन करा

कलासंपादन करा

खेळसंपादन करा

खालील चार प्रमुख व्यावसायिक संघ वॉशिंग्टन महानगरामध्ये स्थित आहेत. अमेरिकेमधील चारही मोठ्या खेळांमधील व्यावसायिक संघ असलेले वॉशिंग्टन हे १२ पैकी एक शहर आहे.

संघ खेळ लीग स्थान स्थापना
वॉशिंग्टन रेडस्किन्स अमेरिकन फुटबॉल नॅशनल फुटबॉल लीग फेडेक्स फील्ड (मेरीलँड) १९३७
वॉशिंग्टन विझार्ड्स बास्केटबॉल नॅशनल बास्केटबॉल असोसिएशन व्हेरायझन सेंटर १९७३
वॉशिंग्टन कॅपिटल्स आइस हॉकी नॅशनल हॉकी लीग व्हेरायझन सेंटर १९७४
वॉशिंग्टन नॅशनल्स बेसबॉल मेजर लीग बेसबॉल नॅशनल्स पार्क २००५

संदर्भयादीसंपादन करा


बाह्य दुवेसंपादन करा

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: