वॉरन बफे
वॉरन बफे (इंग्लिश: Warren Buffet) हे एक अमेरिकन गुंतवणूकदार व उद्योगपती आहेत. बफे ह्यांना जगातील सर्वोत्कृष्ट गुंतवणूकदार मानण्यात येते. वॉरन बफे हे बर्कशायर हॅथवे ह्या गुंतवणूक कंपनीचे अध्यक्ष व प्रमुख अधिकारी आहेत. २००८ साली बफे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होते तर २०११ साली ते तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
वॉरन बफे Warren Buffett | |
---|---|
जन्म |
वॉरन एडवर्ड बफे ३० ऑगस्ट, १९३० ओमाहा, नेब्रास्का, अमेरिका |
राष्ट्रीयत्व | अमेरिकन |
पेशा | बर्कशायर हॅथवेचे प्रमुख अधिकारी |
निव्वळ मालमत्ता | ६२ अब्ज अमेरिकन डॉलर्स |
स्वाक्षरी |
ओमाहा ह्या शहरामध्ये जन्मलेल्या बफे ह्यांनी वयाच्या १५व्या वर्षापासून शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. गर्भश्रीमंत असताना देखील आपल्या काटकसरी जीवनशैली व साधे राहणीमान जगणाऱ्या बफे ह्यांनी आपल्या संपत्तीच्या ९९ टक्के भाग परोपकारी कामांसाठी दान केला आहे.
वॉरन बफे यांचे विचार
संपादन- कधीही एका इन्कम सोर्सवर (उत्पन्नाच्या स्रोतावर) अवलंबून राहू नका. त्याची गुंतवणूक करा आणि दुसरे इन्कम सोर्स (उत्पन्न स्रोत) निर्माण करा.
- किंमत जी तुम्ही देता, मूल्य जे तुम्हाला मिळते.
- जर तुम्ही तुम्हाला गरज नसलेल्या गोष्टी विकत घेत असाल तर लवकरच तुम्हाला तुमच्या गरजेच्या गोष्टी विकण्याची वेळ येणार आहे असा समजा.
- खर्च करून शिल्लक राहिलेले पैसे वाचवू नका, तर पैसे वाचवून जे शिल्लक राहते ते खर्च करा.
- आपल्या दोन्ही पायांनी कधी पाण्याची खोली मोजू नका.
- एक टोपल्यात तुमची सर्व अंडी ठेवू नका..
- जेव्हा आपल्याला माहीत नसते की आपण काय करतो आहोत, तेव्हाच धोका निर्माण होतो .
- मी श्रीमंत बनणार आहे हे मला माहीत होते. त्याबद्दल माझ्या मनात एका मिनिटासाठीही कधी शंका आली नाही.
- नियम क्र.१ : कधीही तुमचे पैसे गमावू नका. नियम क्र. २ : कधीही नियम क्र.1१विसरू नका.
- स्वतःमध्ये केलेली गुंतवणूक म्हणजे सर्वात महत्त्वाची गुंतवणूक
- प्रामाणिकपणा हे खूप महागडी वस्तू आहे, त्याची हलक्या लोकांकडून अपेक्षा करू नका
- मी एक चांगला निवेशक आहे कारण मी एक व्यापारी आहे आणि मी एक चांगला व्यापारी आहे कारण मी एक निवेशक आहे.
- नेहमी दीर्घकालीन गुंतवणूक करा.
- आज कोणीतरी झाडाच्या थंड सावलीमध्ये बसलेला आहे, कारण ते झाड खूप पूर्वी कोणी तरी लावलेले होते.
- पैशाची बचत करण्यासाठी वयाची गरज नसते.
- जितक्या लवकर चांगल्या ठिकाणी पैसा गुंतवता येईल तितक्या लवकर पैसा गुंतवा.
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत