वैधता
हा विभाग/लेख सामान्य उल्लेखनीयता मार्गदर्शक तत्त्वांच्या अनुरूप नाही. |
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. |
वैधता (legitimacy) या शब्दाची व्याख्या वेगवेगळ्या अभ्यास विषयात त्यात्या विषयानुरूप असते.
विधितत्त्वमीमांसा विषयात कारणाची वैधता आणि कृतीचा कायदेशीरपणा या स्वतंत्र गोष्टी असतात. एखादी गोष्ट कायदेशीर असेल पण वैध नसेल किंवा उलटपक्षी वैध असेल पण कायदेशीर नसेल असे होऊ शकते. अभ्यासक थॉमस हिलबिंक यांच्या मतानुसार कायद्याच्या आज्ञाधारकेतेची शक्ती, कायदा आणि कायद्याचे एजंट वैध आणि आज्ञाधारकता दाखवण्यास लायक आहेत असा जनमताचा विश्वास निर्माण करण्याच्या शक्तीतून येते. तर टायलर यांच्या मतानुसार, वैधता हा.. अधिकारी, संस्था, अथवा सामाजिक संरचना योग्य, उचित, आणि न्याय्य आहेत विश्वास निर्माण करणारा मानसशास्त्रिय गुणधर्म आहे. वेगळ्या पद्धतीने मांडावयाचे तर, कायदा आणि त्याच्या एजंटानी, वागणूक योग्य ठेवण्यास सांगण्याच्या दृष्टीने आणि अनुपालन करवून घेण्याच्या दृष्टीने त्यांचे आदेश देण्याचे अधिकार, रास्त आणि न्याय्य आहेत असा विश्वास निर्माण करणे म्हणजेच कायद्याची वैधता. मानववंशशास्त्र काद्याची वैधता हे कायद्याचे कर्तव्य असल्याचे मानते.
तर्कशास्त्र
संपादनवैधता: तर्कशास्त्रात, युक्तीवादातील प्रत्येक पायरी साधार आणि तर्कपूर्ण असेल तर निष्कर्षाची वैधता स्वीकार्य होते. प्रत्येक अर्थाविष्कारात बरोबर असेल तरच सूत्र वैध ठरते, आणि मांडणीच्या आकृतीबंधातील प्रत्येक युक्तिवाद वैध असेल तरच युक्तिवादाची मांडणि वैध ठरते.