वैद्युत संचरण व दूरसंचार अभियांत्रिकी
वैद्युत संचरण व दूरसंचार अभियांत्रिकी (इंग्रजी: इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलेकम्युनिकेशन इंजिनीअरिंग) ही अभियांत्रिकीची एक प्रमुख शाखा आहे. या शाखेच्या अभ्यासक्रमांतर्गत पायाभूत विद्युतशास्त्रासोबत प्रामुख्याने सूक्ष्मविद्युत पातळीवर चालणाऱ्या उपकरणांचा (उदा. विविध प्रकारचे ट्रांझिस्टर) व यंत्रांचा अभ्यास असतो, तसेच दूरसंचार व दळणवळण शास्त्राच्या वेगवेगळ्या सैद्धांतिक व तांत्रिक बाबी शिकविल्या जातात.
वैद्युत अभियांत्रिकी, किंवा इलेक्ट्रॉनिक अभियांत्रिकी ही विद्युत अभियांत्रिकीची एक उपशाखा आहे जी २० व्या शतकाच्या सुरुवातीला उदयास आली आणि विद्युत प्रवाह वाढविण्यासाठी आणि नियंत्रित करण्यासाठी अर्धसंवाहक उपकरणांसारख्या सक्रिय घटकांच्या अतिरिक्त वापराद्वारे ओळखली जाते. पूर्वी विद्युत अभियांत्रिकीमध्ये फक्त यांत्रिक कळ (मेकॅनिकल स्विच), विद्युत्विरोधक (रेझिस्टर), प्रेरक (इंडक्टर) आणि संधारित्र (कपॅसिटर) सारख्या निष्क्रिय उपकरणांचा वापर केला जात असे