वेसेल हे जर्मनीच्या नोर्डऱ्हाइन-वेस्टफालन राज्यातील शहर आहे. वेसेल जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र असलेले हे शहर ऱ्हाइन आणि लिप्पे नद्यांच्या संगमावर वसलेले आहे.

दुसऱ्या महायुद्धादरम्यान हे शहर नाझी जर्मनीचे रसदकेंद्र होते. १६-१९ फेब्रुवारी, १९४५ दरम्यान दोस्त राष्ट्रांनी येथे तुफान बाँबफेक करून शहर बेचिराख करून टाकले होते. या हल्ल्यात शहराचा अंदाजे ९७% भाग नष्ट झाला होता. त्यानंतर चालून येणाऱ्या दोस्त सैन्यांच्या हातात रसद पडू नये म्हणून जर्मन सैन्याने उरलेले शहर जाळून टाकले आणि ऱ्हाइन नदी वरचा २ किमी लांबीचा पूल उडवून टाकला. युद्धाच्या सुरुवातीस २५,००० लोकसंख्या असलेल्या या शहरात मे १९४५ मध्ये फक्त १,९०० व्यक्ती उरल्या होत्या.[]

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ Entry for 23–24 March 1945, "RAF campaign diary March 1945"]