वेताळगड हा महाराष्ट्राच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालूक्यातील एक डोंगरी किल्ला आहे. सोयगाव तालूक्यातील डोंगररांगात विविध लेण्या आहेत.

Vetal fort

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातीलसोयगाव तालूक्यापासून अंभई हळदाघाट हळदागाव मार्गे गेल्यावर चार किलोमीटर अंतर पुढे वेताळवाडी घाट लागतो. घाटाच्या डाव्या बाजूला वेताळवाडी धरणाचा अफाट जलाशय आहे. घाटाच्या तोंडालाच उजव्या हाताला वेताळगड दिसतो. हा किल्ला अतिशय देखणा आहे. रस्त्यावरून सोप्या मार्गाने गडप्रवेश होतो. मुख्य दरवाजा जंजाळा दरवाजा म्हणून ओळखला जातो. किल्ल्याला बुलंद तटबंदी आहे. किल्ल्याच्या आत बालेकिल्ला लागतो. येथे बऱ्यापैकी शाबूत असलेल्या इमारती आहेत त्यांत निवासी इमारत, धान्याचे कोठार, मशीद बारादरी आहेत. वेताळगडावर आता केवळ भग्नावशेष दिसून येतात. []


वेताळवाडी किल्ल्याचे संवर्धनाचे काम चालू असले तरी तिथे आवश्यक अशा कोणत्याही सुविधा नाहीत. पर्यटकांना आपापल्या जवाबदारीवर किल्ल्यावर जावे लागते. एक जूनी तोफही इथे आढळते. आता तिल्या नव्याने किल्ल्यावर आणून ठेवलेले आहे. []

वेताळगडावरील तोफ़

हे सुद्धा पहा

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ "वेताळवाडी". 2020-01-14 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
  2. ^ "वेताळवाडी".