वाढीच्या व विकासाच्या दृष्टीने माणसाच्या आयुष्याचे चार भाग पाडता येतात. बालपण, तारुण्य (तरुण वय), प्रौढत्व (प्रौढ वय) व वृद्धावस्था (म्हातारपण).

११० वर्षांची वृद्धा

त्यातील वृद्धावस्था 5विचित्र प्राचीन कथा(म्हातारपणाबद्दल) हा प्राण्याच्या व माणसाच्या आयुष्याच्या प्रौढत्वानंतरचा शेवटचा कालावधी आहे. आयुष्याच्या साधारण पासष्ठाव्या वर्षापासून मृत्यूपर्यंतचा (६५ वर्षे ते मृत्यू) हा कालखंड असतो. शरीराच्या इतर अवस्थांप्रमाणेच वृद्धावस्थेची सुरुवात होण्याचे वय स्थळ, काळ व सामाजिक परिस्थिती यांनुसार बदलते.

या काळात त्वचेवर सुरकुत्या पडतात, शरीरातील विविध संस्था नीट काम करू शकत नाहीत. शरीर रोग व आजार यांना बळी पडण्याची शक्यता अधिक असते. या अवस्थेनंतर व्यक्तीला मृत्यू येतो.

ऐंद्रियकारक विकास : द्रूष्टिसंबंधीच्या समस्या उद्भवतात. दृष्टिदोष निर्माण होतो कमी उजेडातील वस्तू दिसत नाही.

कोरडे डोळे  : अश्रुपिंडाचे काम कमी झाल्यामुळे डोळ्यात पाणी (अश्रू) तयार होण्याचे प्रमाण कमी होत जाते. त्यामुळे डोळे कोरडे झाल्यासारखे वाटतात.. नेत्र पटलावरील रक्तवाहिन्या फुटल्यामुळे डोळ्यांच्या कार्यात फरक पडतो. प्रतिमा धूसर व अस्पष्ट दिसू लागते.

मोतीबिंदू (Cataract) : ६५ वर्षानंतर मोतीबिंदूमुळे अंधत्व येण्याचे प्रमाण बरेच असते. काचबिंदूवर ढगाळल्यासारखे दिसते यालाच मोतीबिंदू म्हणतात.

समस्यासंपादन करा

वृद्धावस्थेत लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.शरीरातील अनेक अवयव कमजोर झालेले असतात, त्याचबरोबर कुटुंबातील अनेक व्यक्तींची बोलणी खावी लागतात. अंधत्व, दात पडणे, ऐकू कमी ऐने, व्यक्ती ओळखता न येणे अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.

त्वचा : त्वचेतील कोलाजीन (Cologen)ची लांबी वाढणे आणि त्यामुळे त्वचेची लवचीकता कमी होणे. त्वचेचा मऊपणा कमी होऊन ती खरबरीत लागते. तिच्यावरील सुरकुत्या दिसून येतात. वजन कमी होणे हे पण सुरकुत्या पडण्याचे एक कारण आहे.

केस : म्हातारपणाची एक खूण म्हणजे केस पांढरे होणे, इतकेच नाही तर ते विरळही होतात. त्यामुळे टक्कल पडते. या मागे संप्रेरकांच्यातील बदल कारणीभूत आहे.

हालचाली पूर्वीसारख्या सफाईदार हालचाली होत नाहीत. हालचाली कमी होतात. चालण्यात बदल दिसतो.

दात : दात खराब होणे, पडणे, किडणे, हिरड्यांचे आजार होणे हे चालू होते. नैसर्गिक दात पडून त्या ठिकाणी कवळी लावावी लागते. दात पडल्याने त्यांच्या स्वप्रतिमेवर परिणाम होतो. तोंडाचे बोळके झाल्यामुळे बोलणे बरेच वेळा स्पष्ट होत नाही.

शरीर : एकूण शरीराला बाक येतो. चालताना तोल जाऊ शकतो. तोल जाऊ नये म्हणून हातकाठी वापरावी लागते.

निद्रा : म्हातारपणी झोपेची तक्रार सुरू होते जसे की झोप न लागणे, गाढ झोप न येणे, झोपेतून जागे होणे, परत झोप लवकर न लागणे अशा तक्रारी सुरू होतात. मेंदूमध्ये असणारे झोप नियंत्रण केंद्रातील रचनेत होणारे बदल आणि संप्रेरकांतील बदल.

वृद्धावस्थेतील काळजीसंपादन करा

जगभरात वृद्धांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे .त्यांच्या अनेक समस्या आहेत .त्यावर उत्तर शोधण्यासाठी अनेक संस्था भारतात कार्य करीत आहेत .tata institute of social sciences ह्या संस्थेने geriatric care providerसाठी छान प्रशिक्षण सुरू केले आहे .औरंगाबाद येथे डॉ.हेडगेवार रुग्णालय येथे आस्था फौंडेशन ने हे प्रशिक्षण सुरू केले आहे .आतापर्यंत ३५ विद्यार्थी हे प्रशिक्षण घेऊन सिद्ध झाले आहेत .

वृद्धावस्थेतील वैद्यकीय समस्यांसाठी आरोग्यशास्त्राची Geriatrics नावाची शाखा आहे..

वृद्धांच्या समस्यांवरील पुस्तकेसंपादन करा

  • आपल्यासाठी आपणच : उत्तरायुष्य गुणवत्तापूर्ण जगण्यासाठी (रोहिणी पटवर्धन)
  • जेष्ठ व सेवानिवृत्तांसाठी..(सनी सुंठणकर)
  • वृद्ध आणि त्यांचे प्रश्न (डॉ. अ.स. गोडबोले, डॉ. श्रीरंग अ. गोडबोले)
  • वृद्ध : घराचे वैभव (बी ए. शिखरे)
  • वृद्धत्व आनंदी कसे करावे (संपादित लेख. संपादक - अरुण रामकृष्ण गोडबोले)
  • वृद्धत्व देशोदेशी (पी. के. मुत्तगी, पद्माकर नागपूरकर)
  • वृद्धत्व : समस्या आणि उपाय (डॉ. शंकरराव पोतदार)

संदर्भ

वैचारिक मानस शास्त्र