वृक्ष दोहद हा शब्द वृक्षामधल्या अभिलाषेचा द्योतक आहे. वृक्षांनाही काही अभिलाषा असते असे भारतीय संस्कृतीत मानले जाते. वृक्ष दोहदाची पूर्तता कोण्या सुंदरीच्या विशेष क्रियेने होते. वैदिक साहित्य, रामायण, महाभारत, संस्कृत-प्राकृत नाटके आणि काव्ये, रीतिकाव्ये आणि लोकगीतांमध्ये वृक्ष दोहदाचे खूप वर्णन येते. भारतीय संस्कृतीची अशी मान्यता आहे की, की काही वृक्षांची अशी इच्छा असते की त्यांच्या बहरण्या-फुलण्याच्या काळात, म्हणजे तारुण्यात एखाद्या स्त्रीने त्याला स्पर्श करावा, त्याला थोपटावे किंवा त्यावर पदाघात करावा. याच कारणाने भारतीय साहित्यात युवतींच्या उपवन-वाटिकांवरच्या वा उद्यानांवरच्या प्रेमाचे वर्णन आहे. ह्या उद्यानांमधील क्रीडांचे विविध प्रकार स्त्रियांच्या मनोरंजनाचे आवडते साधन होते. अशी समजूत होती की, वृक्ष नारीच्या स्पर्शाची इच्छा बाळगतो, तसेच नारीही वृक्षांशी क्रीडा करण्याची इच्छा करून तितकीच आनंदते. ह्या दोन्हींमुळे त्यांचे आरोग्य आणि सौदर्य सांभाळले जाते. याच प्रचलित लोकविश्वासाला संस्कृत कवींनी त्यांच्या साहित्यांत स्थान दिले आहे. 'मालविकाग्निमित्रम्'मध्ये म्हणले आहे की, मदन उत्सवानंतर अशोक वृक्षात दोहद उत्पन्न केला जात होता. ही दोहद क्रिया अशी होती. : कोणी एखादी सुंदरी अंगावर सर्व प्रकारची आभूषणे घालून पायांना मेंदी लावून, नूपुरे चढवून, डाव्या पायाने अशोक वृक्षावर आघात करत असे. या चरणाघाताचा विलक्षण महिमा होता. अशोक वृक्ष खालपासून वरपर्यंत पुष्पगुच्छांनी भरून जात असे. कालिदासाने 'मेघदूतम्'मध्ये लिहिले आहे की, दोहद ही एक अशी क्रिया की जी बांबू-ऊस यांसारखी झाडे, वृुक्ष, लता वगैरेंमध्ये अकाली पुष्पधारणा करण्याच्या दिशेने काम करते. मेघदूतात त्याने लिहिले आहे की% उद्यानाच्या मध्यभागी जी अशोकाची एका प्रियाच्या पदाघाताने व दुसरा मदिरेच्या चुळीमुळे फुलण्याची अपेक्षा धरून होता. दोहद हे असे द्रव्य किंवा द्रव्याची फुंकर आहे की जी वृक्षांमध्ये तसेच वेलींमध्ये फूल आणि फळ देण्याची शक्ती प्रदान करते, असा 'नैषधीयचरिता'त उल्लेख आहे.

भारतीय साहित्यात में अलग-अलग वृक्ष, लता, आदींना ध्यानात घेऊन प्रियंगु दोहद, बकुल दोहद, अशोक दोहद, कुरबक दोहद, मंदार दोहद, चंपक दोहद, आम्र दोहद, कर्णिकार दोहद, नवमल्लिका दोहद आदींची कल्पना केली आहे. भारतीय कला विशेषांनुसार, विशेषतः शुंगकालीन कलांमध्ये उद्यान क्रीडांच्या स्वरूपांत शालभंजिका, आम्रभंजिका, सहकारभंजिका, पुष्प वचायिका यांची रूपेही वर्णन केली आहेत.

% रक्‍ताशोकश्‍चलकिसलयः केसरश्‍चात्र कान्‍त:
प्रत्‍यासन्‍नौ कुरबकवृतेर्माधवीमण्डपस्‍य।
एकः सख्‍यास्‍तव सह मया वामपादाभिलाषी
काङ्क्षत्‍वन्‍यो वदनमदिरां दोहदच्‍छद्मनास्‍या:।। ... उत्तर मेघदूत श्लोक १५वा.

मराठीत अर्थ : त्या क्रीडा उद्यानामध्ये कुबरक वृक्षांनी वेढलेला मोत्याचा मांडव आहे. त्याच्या जवळ नव्याने पालवी फुटलेला (किसलय),चंचल पानांचा आणि लाल फुलांचा अशोक वृक्ष आहे. दुसऱ्या बाजूला बकुळीचा वृक्ष (केसव) आहे. पहिला माझ्यासारखा दोहदच्या निमित्ताने तुझ्या सखीच्या डाव्या पायाचा प्रहार इच्छितो आहे व दुसरा तिच्या तोंडच्या मदिरेच्या चुळीची अपेक्षा करतो आहे.