वृक्षारोपण
वृक्षारोपण ही विविध प्रकारच्या झाडांची जाणीवपूर्वक केलेली लागवड होय.
शासकीय banyan जंगलाखाली असणारे भूक्षेत्र वाढावे या साठी मोठ्या पातळीवर वृक्षारोपणाचे कार्यक्रम हाती घेतले जातात. पूर्वी या वृक्षारोपण कार्यक्रमामुळे सुबाभूळ, गुलमोहोर, निलगिरी अशी परदेशी झाडे भारतात लावली गेली. या झाडांची आपल्या स्थानिक पक्ष्यांना सवय नसल्याने या झाडांचा अथवा या झाडांची पाने फुले फळे यांचा वापर भारतीय पक्षी करत नाहीत. कालांतराने शासकीय यंत्रणेला या वृक्षारोपण कार्यक्रमातील त्रुटी लक्षात आल्या. सध्या भारतातील स्थानिक प्रजातींची लागवड करण्याकडे सर्व शासकीय यंत्रणा तसेच गैर सरकारी संस्थांचा कल आहे.
उद्देश
संपादन१) जमिनीवरील झाडांची संख्या वाढवणे
२) जीव विविधता जपण्यासाठी
३) कीटक, पक्षी, सरीसृप , प्राणी यांना हक्काचा अधिवास निर्माण करून देण्यासाठी
४) जमिनीची धूप होऊ नये म्हणून.
५) पाणी अडवून जमिनीत जिरवता यावे.
६) वाळवंटीकरण रोखण्यासाठी.
पावसाचे प्रमाण वाढवण्यासाठी
प्रसिद्ध व्यक्ती
संपादनवृक्षारोपण तसेच वृक्षसंवर्धन क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्ती
१) जादव पायेंग - आसाम मधील या सामान्य माणसाने ब्रह्मपुत्रा नदीच्या पुरात मरण पावलेल्या सापांकडे आणि प्राण्याकडे पाहून उजाड बेटावर झाडे लावण्यास सुरुवात केली. गेल्या अनेक वर्षात या जंगलाचा पसारा १३३० एकरांपेक्षा जास्ती भूभागावर पसरला आहे. २०१५ साली भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने यांना सन्मानित केले आहे.
२) वांगारी मथाई - केन्यामधील या पर्यावरण चळवळीच्या कार्यकर्तीने 'हरित पट्टा चळवळ' ही मोहीम चालवून वृक्षारोपणाचे मोठे काम केले. या त्यांच्या योगदानाबद्दल वांगारी मथाई यांना २००४ सालचा शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार प्रदान केला गेला.