विजयगड (पालघर)

(वीजयगड या पानावरून पुनर्निर्देशित)

विजयगड (पालघर) हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातल्या उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यामधल्या वाडा तालुक्यातले एक गाव आहे.

  ?विजयगड

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ .१२१ चौ. किमी
जवळचे शहर वाडा
जिल्हा पालघर जिल्हा
लोकसंख्या
घनता
९९३ (२०११)
• ८,२०७/किमी
भाषा मराठी
सरपंच
बोलीभाषा वारली
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• ४२१३१२
• +०२५२६
• एमएच/४८ /०४ /०५

भौगोलिक स्थान संपादन

वाडा बस स्थानकापासून गौरापूर-कुडुस मार्गाने गेल्यावर अमेय इलेक्ट्रिकल्सनंतर हे गाव लागते. वाडा बस स्थानकापासून विजयगड १८ किमी अंतरावर आहे.

हवामान संपादन

पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती करतात.

लोकजीवन संपादन

विजयगड (पालघर) हे मध्यम आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार ह्या गावात २१९ कुटुंबे राहतात. एकूण ९९३ लोकसंख्येपैकी ४८४ पुरुष तर ५०९ महिला आहेत. गावाची साक्षरता ८१ टक्के आहे. पुरुष साक्षरता ८७ टक्के तर स्त्री साक्षरता ७५ % आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या १३९ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या १४ टक्के आहे. मुख्यतः आदिवासी व कुणबी समाजातील लोक येथे राहतात. कुणबी समाजाचा शेती हा मुख्य व्यवसाय असून आदिवासी समाज शेतमजूर, वीटभट्टीमजूर, कामगार म्हणून काम करतात. ते काही प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा करतात.

नागरी सुविधा संपादन

विजयगडमधे प्राथमिक शिक्षण, प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते, वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता, पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस वाडा बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी मिळतात. रिक्षासुद्धा असतात.

जवळपासची गावे संपादन

जामघर, नेहरोळी, लखमपूर, खुपारी, चिंचघर, डोंगस्ते, बिळवळी, बुधावळी, गुंज, काटी, नांदणीगायगोठा ही जवळपासची गावे आहेत. डोंगस्ते ग्रामपंचायतीमध्ये डोंगस्ते आणि विजयगड ही गावे येतात.

संदर्भ संपादन

१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html

२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html

३. https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/

४. http://tourism.gov.in/

५. http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036

६. https://palghar.gov.in/

७. https://palghar.gov.in/tourism/