विष्णू महेश्वर ऊर्फ दादासाहेब जोग (जन्म : वाई, ६ एप्रिल, १९२७; - २८ जून २०००) हे एक मराठी स्थापत्य अभियंता (Construction Engineer) होते. वाई गावातून प्राथमिक शिक्षण झाल्यावर ते अधिकच्या शिक्षणासाठी पुण्याला आले. सन १९४९ साली ते पुणे इंजिनिअरिंग काॅलेजातून सिव्हिल इजिनिअरिंगची परीक्षा पास झाले. त्यांनी सुरुवातीला मध्य प्रांतात व नंतर मुंबई इलाख्यात नोकरी केली, पण त्यांचे चित्त नोकरीत लागले नाही. नोकरीचा राजीनामा देऊन त्यांनी १९५२ साली किरकोळ भांडवलावर स्वतःची स्थापत्य कंपनी उभारली. आज त्या कंपनीचे कामकाज आख्ख्या भारतात चालते.

दादासाहेब जोग यांच्या कंपनीने रायगड किल्ल्यावर जावयाचा रज्जूमार्ग बांधला आहे. या रोपवेचे उद्घाटन ३ एप्रिल १९९६ रोजी झाले.

वि.म. जोग हे संत ज्ञानेश्वरांचे भक्त होते. ते रोज ज्ञानेश्वरीचा काहीना काही भाग वाचत असत.