हबीब बुरग्विबा (अरबी: حبيب بورقيبة‎‎; ३ ऑगस्ट, इ.स. १९०३ - ६ एप्रिल, इ.स. २०००) हा उत्तर आफ्रिकेमधील ट्युनिसिया देशाचा पहिला राष्ट्राध्यक्ष होता. फ्रान्सपासून ट्युनिसियाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात त्याचा सिंहाचा वाटा होता. स्वातंत्र्यानंतर आपल्या ३० वर्षांच्या प्रदीर्घ कार्यकाळात त्याने ट्युनिसियावर हुकुमशहाच्या थाटात सत्ता गाजवली.

हबीब बुरग्विबा

ट्युनिसियाचा पहिला राष्ट्राध्यक्ष
कार्यकाळ
२५ जुलै १९५७ – ७ नोव्हेंबर १९८७
मागील पदनिर्मिती
पुढील झिने एल अबिदिन बेन अली

जन्म ३ ऑगस्ट १९०३ (1903-08-03)
मोनास्तिर, फ्रेंच ट्युनिसिया
मृत्यू ८ एप्रिल, २००० (वय ७४)
मोनास्तिर
गुरुकुल पॅरिस विद्यापीठ
व्यवसाय राजकारणी
धर्म सुन्नी इस्लाम

१९८७ साली पंतप्रधान झिने एल अबिदिन बेन अलीने बुरग्विबाच्या म्हातारपणाचे कारण देऊन त्याला राष्ट्राध्यक्षपदावरून हाकलले.

बाह्य दुवे संपादन