स्त्री नसबंदी शस्त्रक्रिया


स्त्री नसबंदी शस्त्रक्रिया ही कुटुंबनियोजन व कायम स्वरूपाचे संतती नियमन कार्यक्रमातील एक शस्त्रक्रिया आहे.

स्त्री नसबंदी शस्त्रक्रिया
स्त्री नसबंदी शस्त्रक्रिया करताना
पार्श्वभूमी
कुटुंबनियोजन पद्धत नसबंदी
प्रथम वापर दिनांक १९३०
गर्भधारणा प्रमाण (पहिले वर्ष)
पूर्ण असफल ०.५%
विशिष्ट असफल ०.५%
वापर
परिणामाची वेळ कायमस्वरूपी
उलटण्याची शक्यता काहीवेळा
वापरकर्त्यास सूचना नाही
फायदे व तोटे
गुप्तरोगसंसर्गापासून बचाव नाही
वजन वाढ नाही
फायदे ...
जोखीम शस्त्रकियेनंतरचे धोके

पद्धती संपादन

स्त्री नसबंदी शस्त्रक्रिया दोन पद्धतींनी केली जाते.

  1. पारंपारिक शस्त्रक्रिया- या शस्त्रक्रियेत बेंबीच्या खाली एक-दोन इंच लांबीचा छेद घेतात. यातून ओटीपोटातल्या गर्भनलिका धागा बांधून बंद करण्यात येतात. हेही ऑपरेशन सोपे असते. परंतु निदान सहा-सात दिवस रुग्णालयात राहावे लागते.
  2. लॅपरोस्कोपी (बिनटाक्याची- दुर्बिणीतून होणारी शस्त्रक्रिया) प्रकाराच्या शस्त्रक्रियेत पोटावरचा छेद लहान असतो. त्यातून दुर्बीण घालून त्याच्या मदतीने गर्भनलिका रबरी धाग्याने (सिलिअ‍ॅस्टिक बँडने) बंद करतात. या शस्त्रक्रियेनंतर चार-सहा तासांत घरी जाता येते.

शस्त्रक्रियेसाठी योग्यता संपादन

  • किमान एक मूल ५ वर्षाचे असावे.
  • पाळीवर किंवा प्रसूती नंतर दीड महिन्यानंतर.
  • पी आय डी किंवा इतर आजार नसावेत.

शस्त्रक्रियेसाठी पूर्व तपासण्या संपादन