सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघ

हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक विधानसभा मतदारसंघ आहे.

सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघ - २४९ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. हा सोलापूर जिल्ह्यातील मतदारसंघ आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार, केलेल्या मतदारसंघाच्या रचणेनुसार, सोलापूर शहर मध्य मतदारसंघात सोलापूर उत्तर तालुक्यातील सोलापूर महानगरपालिकेच्या वॉर्ड क्र. ६, २९ ते ३९, ४४ ते ४७, ५०, ५१, ६६ ते ८५, ८९ आणि ९० यांचा समावेश होतो. सोलापूर शहर मध्य हा विधानसभा मतदारसंघ सोलापूर लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या प्रणिती सुशीलकुमार शिंदे ह्या सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार आहेत.[३]

आमदार संपादन

वर्ष आमदार[४] पक्ष
२०१९ प्रणिती सुशीलकुमार शिंदे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२०१४ प्रणिती सुशीलकुमार शिंदे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२००९ प्रणिती सुशीलकुमार शिंदे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

निवडणूक निकाल संपादन

संदर्भ संपादन

  1. ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). Archived (PDF) from the original on 2009-02-19. १२ October २००९ रोजी पाहिले.
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  4. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".