सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ

हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक विधानसभा मतदारसंघ आहे.

सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ - २५१ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. हा सोलापूर जिल्ह्यातील मतदारसंघ आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार, केलेल्या मतदारसंघाच्या रचणेनुसार, सोलापूर दक्षिण मतदारसंघात १. सोलापूर उत्तर तालुक्यातील तिन्हे, शेलगा ही महसूल मंडळे आणि सोलापूर महानगरपालिकेच्या वॉर्ड क्र. ७ ते १४, ४० ते ४३ आणि २. सोलापूर दक्षिण तालुक्यातील होटगी, मंडरूप आणि विचूर ह्या महसूल मंडळांचा समावेश होतो. सोलापूर दक्षिण हा विधानसभा मतदारसंघ सोलापूर लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]

भारतीय जनता पक्षाचे सुभाष सुरेशचंद्र देशमुख हे सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]

आमदार संपादन

वर्ष आमदार[४] पक्ष
२०१९ सुभाष सुरेशचंद्र देशमुख भारतीय जनता पक्ष
२०१४ सुभाष सुरेशचंद्र देशमुख भारतीय जनता पक्ष
२००९ दिलीप ब्रम्हदेव माने भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

निवडणूक निकाल संपादन

संदर्भ संपादन

  1. ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). Archived (PDF) from the original on 2009-02-19. १२ October २००९ रोजी पाहिले.
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  4. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".

बाह्य दुवे संपादन