सोनाली बेंद्रे

मराठी चित्रपट अभिनेत्री
Sonali Bendre (es); Sonali Bendre (hu); سونالی باندرے (ks); Sonali Bendre (ast); Sonali Bendre (ca); Sonali Bendre (de-ch); Sonali Bendre (de); Sonali Bendre (ga); Սոնալի Բենդրե (hy); Сонали Бендре (bg); Sonali Bendre (da); सोनाली बेन्द्रे (ne); سونالی باندرے (ur); Sonali Bendre (nb); Sonali Bendre (nn); سونالى بندر (arz); Sonali Bendre (sv); Sonali Bendre (oc); Sonali Bendre (en); Соналӣ Бендре (tg); सोनाली बेंद्रे (hi); సోనాలి బెంద్రే (te); Sonali Bendre (uz); সোণালী বেন্দ্ৰে (as); Sonali Bendre (en-ca); Sonali Bendre (az); சோனாலி பிந்த்ரே (ta); Sonali Bendre (it); সোনালী বেন্দ্রে (bn); Sonali Bendre (fr); Сонали Бендре (ru); सोनाली बेन्द्रे (mai); ਸੋਨਾਲੀ ਬੇਂਦਰੇ (pa); Соналі Бендре (uk); सोनाली बेन्द्रे (dty); ソーナリ・ベンドレ (ja); सोनाली बेंद्रे (mr); سونالی بيندره (ps); ସୋନାଲୀ ବେନ୍ଦ୍ରେ (or); Sonali Bendre (an); Sonali Bendre (ext); 索娜莉·班德利 (zh); 소날리 벤드레 (ko); Sonali Bendre (sl); सोनाली बेंद्रे (bho); سونالی بندره (azb); سونالی بیندرے (pnb); Sonali Bendre (id); Sonali Bendre (pl); സോണാലി ബേന്ദ്രേ (ml); Sonali Bendre (nl); Sonali Bendre (sq); Sonali Bendre (ms); ಸೋನಾಲಿ ಬೇಂದ್ರೆ (kn); سونالی بندره (fa); Sonali Bendre (gl); سونالي بندر (ar); සෝනාලි බේන්ද්‍රේ (si); Sonali Bendre (fi) attrice indiana (it); ভারতীয় অভিনেত্রী (bn); actrice indienne (fr); ہِندوستٲنؠ فِلِمی اَداکارہ (ks); индийская актриса (ru); मराठी चित्रपट अभिनेत्री (mr); indische Schauspielerin (de); ଭାରତୀୟ ଅଭିନେତ୍ରୀ (or); ban-aisteoir agus mainicín Indiach (ga); بازیگر و مدل هندی (fa); индийска актриса (bg); مذيعه من الهند (arz); indyjska aktorka (pl); ඉන්දියානු නිළිය සහ නිරූපිකාව (si); Indiaas actrice (nl); actriu i model índia (ca); Actriz y modelo india (es); భారతదేశ నటి, హిందీ చిత్రాల్లో ప్రముఖంగా నటించింది. (te); Indian actress and model (en); ভাৰতীয় অভিনেত্ৰী (as); ممثلة هندية (ar); actores a aned yn 1975 (cy); தமிழ்த் திரைப்பட நடிகர் (ta) Бендре, Сонали (ru); सोनाली बेन्द्रे (hi); Sonali Behl (de); ସୋନାଲି ବେନ୍ଦ୍ରେ (or); Sonali Bendre Behl (en); Sonali Bendre (ml)

सोनाली बेंद्रे (जन्म १ जानेवारी १९७५) ही एक भारतीय अभिनेत्री आणि मॉडेल आहे. सोनालीने मुख्यतः बॉलीवूडमधे हिंदी सिनेमांत काम केले आहे. याशिवाय काही तेलुगू, मराठी, तमिळ आणि कन्नड सिनेमांतही तिने काम केलेले आहे. आग (१९९४) मधून तिच्या अभिनयात पदार्पण करण्यापूर्वी तिने मॉडेलिंग केले होते. आग चित्रपटासाठी तिला फिल्मफेर सर्वोत्तम महिला पदार्पण पुरस्कार मिळाला.[१][२][३] बेंद्रे ही दोन फिल्मफेअर पुरस्कार आणि चार स्क्रीन पुरस्कारांसह अनेक पुरस्कारांचे प्राप्तकर्ता आहेत.

सोनाली बेंद्रे 
मराठी चित्रपट अभिनेत्री
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
उच्चारणाचा श्राव्य
स्थानिक भाषेतील नावSonali Bendre
जन्म तारीखजानेवारी १, इ.स. १९७५
मुंबई
कार्य कालावधी (प्रारंभ)
  • इ.स. १९९४
नागरिकत्व
शिक्षण घेतलेली संस्था
व्यवसाय
मातृभाषा
वैवाहिक जोडीदार
  • Goldie Behl (इ.स. २००२ – )
पुरस्कार
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

बेंद्रे यांनी दिलजले (१९९६), मेजर साब (१९९८), सरफरोश (१९९९)[४] आणि हम साथ साथ हैं (१९९९) यांसारख्या व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका केली होती. हमारा दिल आपके पास है (२०००) मधील तिच्या अभिनयामुळे तिला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा स्क्रीन अवॉर्ड मिळाला. बेंद्रे यांनी तमिळ चित्रपट कादलार धिनम (१९९९) आणि तेलुगू चित्रपट मुरारी (२००१) मध्ये देखील काम केले आहे. मुरारी चित्रपटासाठी तिने सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी तेलुगू फिल्मफेअर पुरस्काराचे नामांकन मिळवले. तिच्या इतर यशस्वी तेलुगू चित्रपटांमध्ये इंद्र, खडगम, मनमधुडू (सर्व २००२) आणि शंकर दादा एमबीबीएस (२००४) यांचा समावेश आहे. त्यानंतर बेंद्रे यांनी अनाहत (२००३) या मराठी चित्रपटात काम केले.[५] २००४ च्या अगं बाई अरेच्चा! मराठी चित्रपाटात ती "चम चम करता" या आयटम डान्स मध्ये देखील दिसली.

यानंतर काही काळ अभिनयाला विराम घेउन ती इंडियाज गॉट टॅलेंट आणि इंडियाज बेस्ट ड्रामेबाज यांसारख्या विविध रिॲलिटी शोमध्ये जज म्हणून दिसली आहे. नंतर, बेंद्रे यांनी अजीब दास्तान है ये (२०१४) आणि द ब्रोकन न्यूज (२०२२) या दूरचित्रवाणी मालिकेत काम केले. तिच्या अभिनय कारकिर्दीबरोबरच, बेंद्रे ही अनेक वस्तुंची ब्रँड ॲम्बेसेडर आहे. तिने चित्रपट निर्माते गोल्डी बहलशी लग्न केले आहे ज्यांना एक मुलगा आहे.

वैयक्तिक जीवन संपादन

सोनाली बेंद्रेंचा जन्म १ जानेवारी १९७५ साली मुंबईमधे एका महाराष्ट्रीय चांद्रसेनीय कायस्थ प्रभू कुटुंबात झाला.[६][७] तिला दोन बहिणी आहेत. तिचे वडील नागरी सेवक होते.[८] तिने तिचे शालेय शिक्षण केंद्रीय विद्यालय, बंगलोर येथून पूर्ण केले आणि मुंबईतील रामनारायण रुईया महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण पूर्ण केले.[९]

बेंद्रे व चित्रपट निर्माता गोल्डी बहल यांची पहिली भेट त्यांच्या नाराझ चित्रपटाच्या सेटवर झाली.[१०][११] गोल्डी हा दिग्दर्शक रमेश बहल यांचा मुलगा आहे. सोनालीचे १२ नोव्हेंबर २००२ रोजी गोल्डी बहलशी यांच्याशी मुंबईत लग्न झाले.[१२]. ११ ऑगस्ट २००५ ला सोनालीने एका मुलाला (नाव - रणवीर) जन्म दिला.[१३]

जुलै २०१८ मध्ये बेंद्रेनी जाहीर केले की, तिला मेटास्टॅटिक कर्करोगाचे निदान झाले आहे आणि न्यू यॉर्क शहरातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.[१४] चौथ्या स्टेजचा कर्करोग असूनही, अभिनेत्री २०२१ मध्ये कर्करोगमुक्त झाल्याचे कळवले.[१५]

वाद संपादन

१९९८ मध्ये, बेंद्रे यांच्यावर सहकलाकार सलमान खान, सैफ अली खान, तब्बू आणि नीलम कोठारी यांच्यासह राजस्थानमधील जोधपूर जिल्ह्यातील कांकणी गावाच्या बाहेरील भागात दोन काळवीटांची शिकार केल्याचा आरोप करण्यात आला होता.[१६] कनिष्ठ न्यायालयाने तिच्यावर वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२ आणि भारतीय दंड संहिता अंतर्गत आरोप लावले.[१७] न्यायालयाच्या विविध वादानंतर, बेंद्रे यांची ५ एप्रिल २०१८ रोजी काळवीट शिकार प्रकरणातून निर्दोष मुक्तता करण्यात आली.[१८][१९]

सार्वजनिक प्रतिमा संपादन

बेंद्रे यांना बॉलिवूडमधील सर्वात स्टायलिश अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखले जाते.[२०][२१] न्यूझ१८ इंडियाने तिला "बॉलिवुडची गोल्डन गर्ल" असे संबोधले आहे.[२२] २००७ मध्ये रेडिफ.कॉम ने "बॉलीवूडच्या सर्वात सुंदर अभिनेत्री" या यादीत तिचा समावेश केला होता.[२३]

२०१५ मध्ये, बेंद्रे यांनी "द मॉडर्न गुरुकुल: माय एक्सपेरिमेंट विथ पॅरेंटिंग" नावाचे एक पुस्तक लिहिले, जे प्रथमच आई म्हणून तिच्या कर्तृत्व आणि आव्हानांबद्दल बोलते.[२४] बेंद्रे २०१६ च्या फोर्ब्स इंडिया मासिकाच्या "सेलिब्रिटी १००" यादीत ९९ व्या क्रमांकावर दिसली व तिचे अंदाजे वार्षिक उत्पन्न  ६५ दशलक्ष (US$१.४४ दशलक्ष) होते.[२५] २०१८ मध्ये, बेंद्रे ही पाकिस्तानमधील गुगल वर सर्वाधिक शोधले गेलेले व्यक्तिमत्त्व होती.[२६]

संदर्भ संपादन

  1. ^ "Sonali Bendre leaves fans mesmerised as she shares a video of her different avatars from the 90s". The Times of India. 22 January 2023 रोजी पाहिले.
  2. ^ Azad, Tasnim (11 September 2018). "5 best movies of Sonali Bendre". EasternEye (इंग्रजी भाषेत). 8 June 2019 रोजी पाहिले.
  3. ^ "Filmfare Awards Winners From 1953 to 2019". filmfare.com (इंग्रजी भाषेत). 10 June 2019 रोजी पाहिले.
  4. ^ "Rediff On The NeT: Sarfarosh Roars Across America". www.rediff.com.
  5. ^ "Anaahat: Delving deep into human psyche". Rediff.com. 26 September 2003.
  6. ^ Calendar of Historical Events, Births, Holidays and Observances. ISBN 1605011096.
  7. ^ "10 throwback photos of birthday girl Sonali Bendre that will make you drool over her beauty". Times Now News (इंग्रजी भाषेत). 1 January 2019 रोजी पाहिले.
  8. ^ Kamat, Payal. "Goldie Behl's Maha Mantra". Mid Day. 7 April 2019 रोजी पाहिले. .....brother-in-law's place in the prized locality of Dadar.... My father-in-law, for instance, was a civil servant who worked in the CWC.........[Sonali Bendre]'s family is CKP....
  9. ^ "Personal Agenda: Sonali Bendre". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 31 May 2012. 27 December 2019 रोजी पाहिले.
  10. ^ "Sonali Bendre-Goldie Behl's Love Story". indiatimes.com. 7 April 2013. 7 January 2018 रोजी पाहिले.
  11. ^ "Sussanne Khan reveals she got to know Sonali Bendre through Goldie Behl: He was smitten with her". India Today. 5 May 2019. 25 June 2020 रोजी पाहिले.
  12. ^ "bollyvista.com". Sonali Bendre's set to tie the knot!. Archived from the original on 2013-10-05. 9 August 2007 रोजी पाहिले.
  13. ^ "Sonali Bendre delivers a baby boy". ExpressIndia.com. 12 August 2005. 2010-10-18 रोजी पाहिले.
  14. ^ "Sonali Bendre: Bollywood star's cancer posts inspires India fans". BBC News. 3 December 2018. 27 December 2018 रोजी पाहिले.
  15. ^ "Cancer warrior Sonali Bendre reveals doctors told her she had '30 per cent chance' of survival". Times Now. 10 August 2022 रोजी पाहिले.
  16. ^ "Blackbuck case: Sonali, Salman, Saif charged with poaching". The Hindu. 25 August 2007. Archived from the original on 12 October 2007. 10 October 2007 रोजी पाहिले.
  17. ^ Pillai, Pai (1 September 2007). "Salman Khan expresses faith in judiciary". news.sawf.org. Archived from the original on 12 October 2007. 10 October 2007 रोजी पाहिले.
  18. ^ "Blackbuck poaching case: Jodhpur HC issues notice to Saif, Tabu, Sonali Bendre". Deccan Chronicle (इंग्रजी भाषेत). 11 March 2019. 11 March 2019 रोजी पाहिले.
  19. ^ "Blackbuck poaching case: Salman Khan gets 5-year jail term". The Economic Times. 5 April 2018. 5 April 2018 रोजी पाहिले.
  20. ^ "Aishwarya, Karisma to Sonali: 90s Bollywood actresses, then and now". Free Press Journal. 8 June 2019 रोजी पाहिले.
  21. ^ "#ETimesTrendsetters: Sonali Bendre, the 90s crush who made jaws drop with her iconic style statements!". The Times of India. 12 August 2022 रोजी पाहिले.
  22. ^ "A look at Sonali Bendre's inspirational journey". News18. Archived from the original on 2 January 2024. 16 January 2024 रोजी पाहिले.
  23. ^ "Bollywood's Most Beautiful Actresses". Rediff.com. Archived from the original on 15 May 2007. 6 April 2007 रोजी पाहिले.
  24. ^ "The modern gurukul: Watch Sonali Bendre talk about her new book on parenting". The Indian Express. 24 November 2015. 25 November 2017 रोजी पाहिले.
  25. ^ "2016 Celebrity 100". Forbes India. Archived from the original on 19 December 2019. 20 December 2016 रोजी पाहिले.
  26. ^ "Sonali Bendre, Reham Khan, Sunny Leone: The list of top most 'Googled' people in Pakistan". The News International (इंग्रजी भाषेत). 2019-09-23 रोजी पाहिले.